मुंबई | क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खान यांच्या मुलाला अटक करण्यात आलेली असताना दुसरीकडे याच मुद्द्यावरून कारवाई करणाऱ्या एनसीबीवर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी गंभीर आरोप लगावले आहे. त्यातच आता समीर वानखडे यांच्या नावे बनावट ट्विटर अकाऊंट उघडण्यात आलं आहे.
तसेच सदर अकाऊंटवरून वांद्रे परिसरात छापेमारी केल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे नवाब मलिकांशी संबंधित वादावरही चर्चा करण्यात आली आहे. शनिवारी संध्याकाळी हे अकाऊंट सुरु झालं. याबाबत समीर वानखेडे यांनी या अकाउंटवरून मिळणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नका असं जाहीर केले आहे.
सुरुवातीला या अकाऊंच्या ‘डीपी’मध्ये एनसीबीचा लोगो होता. मात्र काही वेळानंतर त्यात बदल करण्यात आला. एनसीबी लोगोऐवजी ‘नो ड्रग्स’ असा डीपी ठेवण्यात आला. तसेच हे अकाउंट एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचे नसून त्यांना समर्थन देणाऱ्याचे आहे, असेही स्पष्ट करण्यात आले. दरम्यान हे अकाऊंट बनावट असल्याची माहिती समीर वानखेडे यांनी दिली आहे.