राज्य सरकारला धक्का मुंबईच्या कोव्हिड सेंटरची होणार चौकशी

राज्य सरकारला धक्का मुंबईच्या कोव्हिड सेंटरची होणार चौकशी

एमएमआरडी कडून वांद्रा-कुर्ला संकुल येथे उभारलेल्या कोरोना सेंटरच्या उभारणीत भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपावर विरोधकांकडून करण्यात आला होता. आता महाराष्ट्रचे राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांनी या केंद्राची चौकशी करण्याचे आदेश लोकायुक्तांना दिले आहेत. या आदेशामुळे आघाडी सरकारच्या अडचणी वाढवण्याचे संकेत दिसून येत आहे.

मुंबईत एप्रिल-मे महिन्यात वाढलेल्या कोरोना रुग्नांच्या उपचारासाठी शहरातील दवाखाने कमी पडू लागल्यामुळे राज सरकारने तात्पुरत्या स्वरूपातील कोव्हिड सेंटर वांद्रा-कुर्ला संकुल येथे सुरु केले होते. सुमारे १००० खाटांचे हॉस्पिटल उभारण्यासाठी ५९ कोटी खर्च आला होता. मात्र मुंबईत मे महिन्यात पडलेल्या पडलेल्या पावसामुळे आणि निसर्ग वादळामुळेकोव्हिड सेंटरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे केंद्राच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले होते.

यातच खर्चावरून वाद निर्माण होत असताना दुसरीकडे मात्र भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. याप्रकरणी काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन या केंद्राच्या उभारणीची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार राज्यपालांनी लोकायुक्तांना चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत

ग्लोबल न्युज नेटवर्क: