अभिनेत्री सोनम कपूर ही सध्या आपल्या मॅरीड लाइफमुळे चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. सोनम आणि तिचा पती आनंद अहूजा यांना काही महिन्यांपूर्वी पूत्ररत्न प्राप्त झाले. त्यानंतर सोनमनं बॉलिवूडमधून ब्रेक घेतला. सध्या सोनम ही तिनं केलेल्या ट्वीटमुळे चर्चेत आहे. सोनमनं मुंबईमधील ट्रॅफिकबाबत एक ट्वीट केलं. या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले. काही नेटकऱ्यांनी सोनमच्या या ट्वीटला रिप्लाय देऊन तिला ट्रोल केलं आहे. तर अनेकांनी तिला चांगलेच खडेबोल सुनावले आहे.
सोनमनं ट्वीटमध्ये लिहिलं, ‘मुंबईमध्ये गाडी चालवणे त्रासदायक आहे. जुहूपासून बँडस्टँडला पोहोचायला मला एक तास लागला. सर्वत्र खूप बांधकाम आणि खोदकाम, प्रदूषण होते. हे काय चालू आहे?’ तिच्या या ट्वीटला 19 हजारपेक्षा जास्त नेटकऱ्यांनी लाइक केलं आहे. तर अनेकांनी या ट्वीटला कमेंट्स केल्या आहेत.
सोनमच्या ट्वीटला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, ‘दिल्लीचे लोक मुंबईमध्ये प्रदूषणाबाबत बोलत आहेत.’ तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, ‘पापा की परी हो उड के चली जाओ’ अनेक नेटकऱ्यांनी सोनमच्या या ट्वीटला कमेंट करुन तिला ट्रोल केलं आहे. 2020 मध्ये सोनमचा ‘एके वर्सेज एके’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. आता लवकरच ती ब्लाइंड या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये सोनमसोबत अभिनेता पूरब कोहली आणि विनय पाठक हे देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.