Tuesday, January 31, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result

मुंबई शहरात फटाके विक्रीस मनाई, सार्वजनिक ठिकाणी १४ नोव्हेंबरपर्यंत आदेश लागू

by Team Global News Marathi
October 20, 2022
in मुंबई
0
मुंबई शहरात फटाके विक्रीस मनाई, सार्वजनिक ठिकाणी १४ नोव्हेंबरपर्यंत आदेश लागू

 

मुंबईत पोलीस अधिकाऱ्यांच्या परवान्याशिवाय सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना फटाके विक्रीसह फटाके जवळ बाळगणे, हस्तांतरण करणे, प्रदर्शन करणे आणि वाहतूक करण्यास मनाई करण्यात आली आहे.मुंबई पोलीस दलातील अभियान शाखेचे उपायुक्त संजय लाटकर यांनी हे आदेश जारी केले आहेत. १४ नोव्हेंबरपर्यंत आदेश लागू राहतील.

दिवाळीत नागरिक मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करत असल्याने अन्य नागरिकांना होणारा अडथळा, गैरसोय, धोका किंवा अन्य प्रकारचे नुकसान टाळण्यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी फटाक्यांवर काही प्रमाणात निर्बंध घातले आहेत.

आयुक्तांनी नियुक्त केलेल्या किंवा राज्य सरकारने नियुक्त केलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या परवानगी, परवान्याशिवाय कोणत्याही प्रकारचे फटाके विकणे, बाळगणे, हस्तांतरण करणे, प्रदर्शन करणे, वाहतूक करणे यास मनाई करण्यात आली आहे. नागरिकांनीही या आदेश व सूचनांचे पालन करून कोणालाही त्रास न होता आनंदाने दिवाळी साजरी करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

या कालावधीत ५०० मीटर बॉटलिंग प्लांटच्या बफर झोनसोबतच भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि., आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि.च्या परिमितीतील व बाहेरील क्षेत्र, बॉटलिंग प्लांट बफर झोन, माहूल टर्मिनल क्षेत्र, भारत पेट्रोलियम काॅर्पोरेशन लि. बाॅडीयू प्लांट क्षेत्र, हिंदुस्थान पेट्रोलियम काॅर्पोरेशन लि. बीडीयू प्लांट क्षेत्र, स्पेशल ऑइल रिफायनरीच्या १५ आणि ५० एकर क्षेत्र अशा ठिकाणी कोणत्याही प्रकारचे फटाके, राॅकेट्स उडवू किंवा फेकू नये, अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post
उद्धव ठाकरे गटाला धक्का, दीपाली सय्यद शिंदे गटात जाणार?

उद्धव ठाकरे गटाला धक्का, दीपाली सय्यद शिंदे गटात जाणार?

Recent Posts

  • २०२४ लोकसभा निवडणुकीपूर्वी वरुण गांधीं घेणार मोठा निर्णय
  • उद्धव ठाकरे हेच खरे गद्दार ; रामदास कदमांनी पुन्हा साधला निशाणा
  • खासगी टीव्ही चॅनल्सना ‘देशहित’शी संबंधित मजकूर दाखवावा लागणार, केंद्र सरकारचा निर्णय
  • पाणीप्रश्न जिव्हाळ्याचा, या मुद्द्यावर मुख्यमंत्री के.सी. राव यांच्याशी चर्चा करणार
  • ‘पठाण’ची यशस्वी वाटचाल’, कार्तिकच्या सिनेमाची रिलीज डेटमध्य बदल

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group