अभिनेते अमिताभ बच्चन यांची पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांना पापाराझी फारसे आवडत नाहीत हे आता सर्वांनाच माहिती झालं आहे.फोटो काढताना त्या अनेकदा पापाराझींना फटकारताना दिसली आहे. जया बच्चन यांचे असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता पुन्हा एकदा असेच काहीसे पाहायला मिळाले आहे.
शुक्रवारी जया बच्चन यांनी पामेला चोप्राच्या निधनानंतर शोक व्यक्त करण्यासाठी चित्रपट निर्माता आदित्य चोप्राच्या मुंबईतील घरी पोहोचले. जया बच्चन त्या ठिकाणी पोहोचताच पापाराझींनी तिला घेरले आणि त्या संतापल्या. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर दुसरीकडे जया बच्चन यांच्यावर टीका सुद्धा होताना दिसून येत आहे.
पापाराझींनी फोटो काढायला सुरुवात करताच जया यांनी त्यांना दम भरला. या व्हिडिओमध्ये जया बच्चन मुलगी श्वेतासोबत दिसत आहेत. जया पापाराझींना आपल्या कडक आवाजात अंतर राखण्याच्या सूचना देत आहेत. दुसर्या एका व्हिडिओमध्ये जया फोटोग्राफर्सना आमचे फोटो काढू नका, “आता खूप झाले, परत जा.” असे सांगताना दिसत आहे, तर श्वेता शांतपणे त्यांच्या शेजारी उभी होती.