Saturday, September 23, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

MPSC म्हणजे महाराष्ट्र पब्लिक शॉकिंग कमिशन!”; डेटा लीकवरुन अमित ठाकरेंची टीका

by Team Global News Marathi
April 24, 2023
in महाराष्ट्र
0
MPSC म्हणजे महाराष्ट्र पब्लिक शॉकिंग कमिशन!”; डेटा लीकवरुन अमित ठाकरेंची टीका

 

काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या MPSC ची पूर्व परीक्षा देणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचा डेटा लिक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आणि विद्यार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडाली.सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम चॅनलवर माहिती लिक झाल्याचा दावा करण्यात आला. या चॅनलवरील एका ग्रुपमध्ये लाखो विद्यार्थ्यांची संवेदनशील माहिती लिक झाल्याचे सांगितले जात आहे. यातच मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी या प्रकारावरून MPSC वर टीका केली असून, चौकशीची मागणी केली आहे.

टेलिग्राम चॅनलवर सुमारे १ लाख विद्यार्थ्यांचे हॉल तिकिटाचा डेटा लिक झाला आहे. हा फक्त नमुना डेटा आहे. तसेच आमच्याकडे सर्व MPSC विद्यार्थ्यांची अनेक प्रकारची माहिती उपलब्ध आहे, असा दावा टेलिग्राम चॅनलवर तयार करण्यात आलेल्या ग्रुपवर करण्यात आला आहे. या माहितीमध्ये विद्यार्थ्यांचे ऑनलाइन पोर्टल लॉगिन, फी पावती, अपलोड केलेली कागदपत्रे, आधार कार्ड क्रमांक, दूरध्वनी क्रमांक, ईमेल आयडी … आणि बरेच काही आहे.

त्याचप्रमाणे पूर्व परीक्षेची प्रश्नपत्रिका २०२३ देखील उपलब्ध आहे, असा मोठा दावा या चॅनलवर करण्यात आला आहे. यानंतर एकच खळबळ उडाली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तातडीने दखल घेत, या सगळ्यावर खुलासाही जारी केला. मात्र, यावरून आता अमित ठाकरे यांनी टीका केली आहे. महाराष्ट्र पब्लिक शॉकिंग कमिशन’ हीच ओळख सर्वांच्या मनात कायम होईल असा टोला सुद्धा त्यांनी लगावला आहे.

अमित ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून याबाबत भाष्य केले आहे. गेल्या काही वर्षांत एमपीएससीचा पेपर फुटला, परीक्षा केंद्रांवर गोंधळ, निकाल दिरंगाई अशा बातम्यांची महाराष्ट्राला सवय झाली; पण MPSC Data Leak प्रकरण धक्कादायक आहे. अवघ्या सात दिवसांवर आलेल्या महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रं, आयोगाकडे असलेली विद्यार्थ्यांची सर्व माहिती तसंच प्रश्नपत्रिका आपल्याकडे असल्याचा दावा कुणी समाजमाध्यमांवर करत असेल तर हे खूपच गंभीर प्रकरण आहे. उच्चस्तरीय समिती नेमून या प्रकरणाची तत्काळ चौकशी व्हायला हवी.

तसंच, आयोगाने नवीन प्रश्नपत्रिका काढून ही परीक्षा घ्यायला हवी. ‘डेटा खूप मौल्यवान आहे’ हे ओळखून यापुढे एमपीएससीची वेबसाईट हॅकर्सकडून हॅक होणार नाही किंवा डेटा लीक होणार नाही, यासाठी आयोगाने एथिकल हॅकर्स आणि आयटी-डेटा एक्सपर्ट्सच्या सहकार्याने सर्वतोपरी तांत्रिक दक्षता घ्यायला हवी आणि आपली विश्वासार्हता जपायला हवी. अन्यथा, विद्यार्थ्यांना वारंवार धक्के देणाऱ्या गलथान कारभारामुळे या आयोगाची ‘महाराष्ट्र पब्लिक शॉकिंग कमिशन’ हीच ओळख सर्वांच्या मनात कायम होईल, या शब्दांत अमित ठाकरे यांनी हल्लाबोल केला आहे.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post
अजितदादांना मुख्यमंत्री व्हायचं असेल तर आमच्यासोबत यावे; रामदास आठवले यांचा मोठं विधान

अजितदादांना मुख्यमंत्री व्हायचं असेल तर आमच्यासोबत यावे; रामदास आठवले यांचा मोठं विधान

Recent Posts

  • राज्यावर पुढचे ३-४ तास अस्मानी संकट; मुंबई, ठाण्यासह या भागांना मुसळधार पावसाचा इशारा
  • 13 लाख एलआयसी एजंट आणि एक लाख कर्मचाऱ्यांना सरकारची भेट ,अर्थ मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
  • आमच्या पप्पांनी गणपती आणला’, वडापावची गाडी चालविणारे गीतकार, चिमुकले गायक प्रसिद्धीपासून दूर…
  • राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार ,आय एम डी कडून 24 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट….
  • कळंब येथे 28 ऐवजी 29 सप्टेंबरला ईद-ए-मिलाद

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group