Monday, August 15, 2022
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खासदार विनायक राऊत यांनी थेट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दिले ‘हे’ आव्हान !

by Team Global News Marathi
October 30, 2021
in राजकारण
0
नारायण राणेंना पंतप्रधान केले, तरी शिवसेनेला दु:ख वाटण्याचे कारण नाही’ – विनायक राऊत
ADVERTISEMENT

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून सतत शिवसेना आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका करणारे राणे कुटुंबीय यांच्यात पुन्हा एकदा वाद होत असल्याचे चित्र दिसून येणार आहे. आता पुन्हा एकदा नाणार रिफायनरीच्या जागेवरून शिवसेना व नारायण राणे पुन्हा आमनेसामने आले आहेत. हे दोन्ही प्रकल्प आधी निश्चित झालेल्या जागेवरच होणार, त्यात कुठलाही बदल होणार नाही, असं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठणकावलं आहे. मात्र आता यासिन मुद्यावरून शिवसेनेने थेट आव्हान दिले आहे.

DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur
ADVERTISEMENT

रत्नागिरी येथील राजापूर तालुक्यात नाणार येथे रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहेत. तर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वायंगणी, तोंडवळी परिसरात सी वर्ल्डसाठी जमीन संपादन केलं जाणार आहे. नाणार प्रकल्पाला स्थानिकांसह पर्यावरणवाद्यांचा विरोध आहे, तर सी वर्ल्डमुळं विस्थापित व्हावं लागणार असल्यानं स्थानिकांनी नाराजीचा सूर लावला आहे. शिवसेनेनं दोन्ही ठिकाणी स्थानिकांची बाजू घेत प्रकल्पांना विरोध केला आहे. त्यामुळं शिवसेना व भाजपमध्ये पुन्हा वाकयुद्ध सुरू झालं आहे.

ADVERTISEMENT

‘सी वर्ल्ड आणि नाणार हे दोन्ही प्रकल्प त्याच जागी होणार. कुठलाही संबंध नसताना कोणीही काही बोलत असेल तर त्याला काही अर्थ नाही,’ असा टोला राणे यांनी शिवसेनेला हाणला आहे. यावर बोलताना राऊत म्हणाले की, ‘नारायण राणे यांचा जीव ‘सी वर्ल्ड’मध्ये गुंतलेला आहे. हा प्रकल्प फक्त ३०० एकर जागेवर होणार आहे, पण त्यासाठी १४०० एकर जमीन खरेदी करून नातेवाईकांच्या नावावर हॉटेलं उभी करायची हा नारायण राणे यांचा धंदा आहे. मंत्री झाले असले तरी ते त्यापासून दूर गेलेले नाहीत. त्यांचा हा प्रयत्न चालूच रहाणार आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत गावं उद्ध्वस्त करून ‘सी वर्ल्ड’ होऊ देणार नाही,’ असं राऊत म्हणाले.

ADVERTISEMENT

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tech Drift Solutions Tech Drift Solutions Tech Drift Solutions
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्हा बँक निवडणुकीवरुन खासदार उदयनराजे भोसले यांनी लगावला विरोधकांवर टोला!

Next Post

पवारांनी नगरमध्ये पाठ फिरवताच राष्ट्रवादीमध्ये पडली फुट

Next Post
पवारांनी नगरमध्ये पाठ फिरवताच राष्ट्रवादीमध्ये पडली फुट

पवारांनी नगरमध्ये पाठ फिरवताच राष्ट्रवादीमध्ये पडली फुट

Recent Posts

  • नेताजींच्या अस्थी मातृभूमीत परत आणाव्यात, सुभाषचंद्र बोस यांच्या मुलीची विनंती
  • प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी
  • १०० व्या स्वातंत्र्य दिनी आदित्य ठाकरे दिल्लीतून येऊन ध्वजारोहण करतील – किशोरी पेडणेकर
  • “पर्यटनापेक्षा आरोग्य खातं मोठं”, सामनातील टीकेला दीपक केसरकांचं उत्तर
  • महसूल खाते न मिळाल्यामुळे नाराज आहात का? चंद्रकांत पाटील म्हणाले की,

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group