सांगली | सांगली लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांना पितृशोक झाला आहे. त्यांचे वडील, माजी डीवायएसपी आर. के. पाटील यांचे थोड्याच वेळापूर्वी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांना सर्वत्र तात्या या टोपण नावाने ओळखले जात होते. आज दुपारी १ वाजता त्याच्या पार्थिवावर चिंचणी (ता.तासगाव) येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर ठिकठिकाणी उपचार सुरू होते. मात्र, वृद्धापकाळामुळे त्यांचे शरीर उपचारांना म्हणावे तसे साथ देत नव्हते. अखेर आज (सोमवारी) सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. तात्यांनी अनेक वर्षे पोलीस दलात उत्तम प्रकारे काम केले होते. डीवायएसपी या पदावरून ते सेवानिवृत्त झाले. खासदार संजयकाका पाटील यांना घडवण्यात तात्यांचा मोठा वाटा होता.