अमरावती | दिल्ली पब्लिक स्कूल या आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांच्या नामांकित शाळेतील पालकाच्या तक्रारीवरून मुख्याध्यापकाविरुद्ध पोक्सो व अन्य कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. त्याला नुकतीच तातडीनेअटक करण्यात आली. मुख्याध्यापकाने आपल्या शाळेत पहिलीत शिकणाऱ्या सहा वर्षीय विद्यार्थ्याचे केस कातरून त्याला बॅड टच केला.
सदर धक्कादायक घटना येथील स्थानीय आमदार रवी राणा खासदारा नवनीत राणा यांच्या राणा एज्युकेशन संस्थेच्या दिल्ली पब्लिक स्कूल या नामांकित शाळेत नुकतीच घटना उघड झाली याप्रकरणी संबंधित 48 वर्षीय हेमाद्री शेखर देसाई याल मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, मुलासोबत घडलेल्या अश्लील घटनेचा जाब विचारण्यासाठी त्याचे वडील मंगळवारी शाळेत पोहोचले. मुख्याध्यापकाचे दालन गाठून त्याला जाब विचारला. त्यावेळी त्या मुख्याध्यापकाने त्यांनादेखील अश्लील शिवीगाळ केल्याची केली. मुख्याध्यापक इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी तुला माहीत नाही, ही शाळा कुणाची आहे. तो तुझा बाप आहे. मुकाट्याने येथून निघून जा. अशी धमकी त्या पीडित बालकाच्या वडिलांना दिली.
विशेष म्हणजे ही शाळा आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांची असल्याने अशाप्रकारे धमकावण्यात आले त्यामुळे पीडित बालकाच्या वडिलांनी थेट राजापेठ पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत त्याचे गैरवर्तणुकीबाबत मुख्याध्यापकाला बेड्या ठोकल्या.