मोहन भागवत म्हणाले हिंदू म्हणजे देशभक्त, तर खासदार असदुद्दीन ओवेसी म्हणाले गोडसे म्हणजे काय ?

मोहन भागवत म्हणाले हिंदू म्हणजे देशभक्त, तर खासदार असदुद्दीन ओवेसी म्हणाले गोडसे म्हणजे काय ?

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी हिंदू आहे म्हणजे त्याला देशभक्त असायलाच हवे, असे वक्तव्य केले होते. आता भागवत यांच्या या वक्त्यव्याला आवाहन देत खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी प्रश्न विचारला आहे. ‘माझी देशभक्ती ही माझ्या धर्मातून आली आहे, असे महात्मा गांधी सांगायचे’ अशा भागवत यांच्या वक्तव्यानंतर ओवैसींनी ‘गोडसेंबद्दल आपला काय विचार आहे?’ असा सवाल विचारात नव्या वादाला तोंड फोडले आहे.

 

मेकिंग ऑफ ए हिंदू पेट्रियॉट- बैकग्राउंड ऑफ गांधीजीज हिंद स्वराज’ या पुस्तकाचे प्रकाशन सरसंघचालक डॉ. भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भागवत म्हणाले की, देशभक्त ही संज्ञा मोजक्याच लोकांसाठी वापरायची, असे आम्ही कधीही मानत नाही.

 

भारतात तरी प्रत्येक व्यक्तीमध्ये या भूमीला पवित्र मानण्याची, आपले मानण्याची एक प्रवृत्ती आहे. भूमीच्या पावित्र्याची पूजा करण्याची प्रवृत्ती प्रत्येक भारतीयांमध्ये विविध रूपाने विद्यमान आहे असे भागवत यांनी बोलून दाखविले.

आता भागवत यांच्या या वक्तव्यावर खासदार ओवैसीं यांनी भाष्य केले आहे. मग गोडसेबद्दल आपला काय विचार आहे? भागवत याचं उत्तर देतील का? गांधींजींचा हत्यारा गोडसेबाबत काय मत आहे? नेल्ली नरसंहारासाठी जबाबदार लोकांबाबत, १९८४ च्या शीख विरोधी आणि २००२ गुजरात नरसंहार बाबत काय?” असा सवाल ओवैसींनी केला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: