मुंबई | मॉर्निंग कन्सल्ट या कंपनीने केलेल्या सर्व्हेमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांची मान्यता असलेल्या नेत्यांमध्ये जगात पहिल्या क्रमांकाचे नेते ठरले असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्विट करत दिली आहे. यावर आता भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही ट्वीट करत मोदींचे कौतुक केले आहे.
चंद्रकांत पाटील आपल्या ट्विटमध्ये म्हणतायत की, “भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक पातळीवर आपल्या विकास कार्यांच्या जोरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मोदी जी पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरले असून त्यांनी अनेक जागतिक नेत्यांना पिछाडीवर टाकले आहे. अभिनंदन मोदी जी!”, असे ट्वीट त्यांनी केले आहे.
दरम्यान नारायण राणे यांनी ट्वीट करत म्हटले होते की, “खरंच हा अभिमानाचा क्षण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगभरातील लोकमान्यता असलेल्या नेत्यांमध्ये तब्बल ७७% रेटिंग मिळालं आहे. यामुळे ते पुन्हा एकदा ते सध्याच्या काळातील जगातील सर्वात मोठे नेते ठरले आहेत. हे रेटिंग जून २०२१ मधील ६६% टक्क्यांवरून नोव्हेंबर २०२१ मध्ये ७७ टक्क्यांवर गेलं आणि त्यानंतर आता ७७% वर आहे. यामुळे ही अभूतपूर्व वाढ आहे