मनसे नगरसेवक वसंत मोरे यांनी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर केलेल्या टीकेला आता श्रीमंत कोकाटे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. देशात लोकशाही आहे. आपल्याकडे अफगाणिस्तान सारखं तालिबानी राज्य आलेले नाही. राज ठाकरेंना दादर मध्ये फिरू देणार नाही हे हास्यास्पद आहे. तसेच प्रवीण गायकवाड यांना पुण्यात फिरून न देणे हेही हास्यास्पदच आहे. गायकवाड हेही पुण्याचेच आहेत ना? त्यामुळे पुणे कोणाच्या बापाचं नाय हे मनसेने लक्षात ठेवावं. असं प्रत्यत्तर श्रीमंत कोकाटे यांनी वसंत मोरे यांना दिले आहे.
तसेच राज ठाकरे यांना टोला लागवताना कोकाटे म्हणाले की, मनसेच्या राज ठाकरेंना वाटत असेल की पुरंदरेना लोटांगण घातले म्हणून आपण खूप मोठे झालो. तर अशा भ्रमात राहू नका. मी प्रवीण गायकवाड यांच्या भूमिकेचे समर्थन करतो असेही ते म्हणाले आहेत.
बाबासाहेब पुरंदरे यांच्या शिवचरित्र लेखनाचा संचार घेताना ते म्हणाले, आपल्या राज्यात ज्या धार्मिक दंगली झाल्या याला बाबासाहेबांचा शिवचरित्र कारणीभूत आहे. पुरंदरेंनी जिजाऊ आणि शिवरायांची बदनामी करणारी पार्श्वभूमी तयार केली. हे मनसेला मान्य असेल तर त्यांनी महाराष्ट्र समोर पुढे येऊन ते जाहीर करावं. पुरंदरेंच सातत्याने समर्थन करतात हे महाराष्ट्राला पटत नाही. लेखनाच समर्थन करणारा व्यक्ती महाराष्ट्राचा शत्रू असल्याचं ते म्हणाले आहेत.