मनसे सरचिटणीस देशपांडेसह चार जणांना अटक

मनसे सरचिटणीस देशपांडेसह चार जणांना अटक

सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकल सेवा सुरु करावी अशी मागणी काही दिवसांपुर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली होती. याविरोधात त्यांनी सविनय कायदेभंग करून काल रेल्वे पोलिसांचे आदेश झुगारून लोकलने प्रवास केला होता. या विरोधात आता त्यांच्यावर रेल्वे पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.

रेल्वे सुरू करण्यासाठी सविनय कायदेभंग करत रेल्वे प्रवास केलेले मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे, संतोष धुरी, गजानन काळे आणि अतुल भगत यांना अटक करण्यात आली आहे. कर्जत चारफाटा येथे पोलिसांनी त्यांना अटक केली. यापूर्वी मनाई असताना लोकलमधून प्रवास केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सध्या राज्यात कोरोनाचे संकट अधिक गडद होत चालले असताना या संकटात सामान्य नागरिकांना प्रवासाची मुभा दिल्यास मोठ्या प्रमाणात कोरोनाचे संकट पसरू शकते या कारणामुळेच अद्याप लोकलने सामान्य नागरिकांना प्रवास करण्यास मुभा देण्यात आलेली नाही असे स्पष्टीकरण परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलेले आहे तसेच या प्रकरणी कोणी राजकारण करू नये असा सल्ला सुद्धा त्यांनी मनसेला दिला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: