मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ९ मार्च आज १५ व वर्धापन दिन सोहळा. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी पार्क दादर येथे दरवर्षी होणारा वर्धापन दिनाचा सोहळा रद्द करण्यात आला आहे. गेल्यावर्षी वर्धापन दिन सोहळा हा नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता.
त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. राज ठाकरेंनी ट्वीट करत या शुभेच्छा दिल्या आहेत. “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील माझ्या सर्व सहकाऱ्यांना वर्धापन दिनाच्या मनापासून शुभेच्छा,” असे ट्वीट राज ठाकरेंनी केले आहे.
विशेष म्हणजे या ट्वीटमध्ये त्यांनी काही हॅशटॅगही वापरले आहेत. #मनसेवर्धापनदिन #महाराष्ट्रधर्म #हिंदवीस्वराज्य #महाराष्ट्रप्रथम #राजठाकरे #महाराष्ट्रसैनिक असे टॅग वापरले आहेत.
तसेच वापरलेल्या फोटोत किल्याचे बुरुज आणि सजवलेल्या फुलांच्या माळा दिसून येत आहे. त्याच बरोबर उडणाऱ्या पक्षाचा फोटो सुद्धा आढळून येत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मनसे मोठी झेप घेणार हे यातून दिसून येत आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील माझ्या सर्व सहकाऱ्यांना वर्धापन दिनाच्या मनापासून शुभेच्छा. #मनसेवर्धापनदिन #महाराष्ट्रधर्म #हिंदवीस्वराज्य #महाराष्ट्रप्रथम #राजठाकरे #महाराष्ट्रसैनिक pic.twitter.com/MnM9cLbVlQ
— Raj Thackeray (@RajThackeray) March 9, 2021