उत्तरप्रदेश | उत्तर प्रदेश शाहजहांपूर जिल्ह्यातील कटरा येथील भारतीय जनता पक्षाचे आमदार वीर विक्रम सिंह यांचा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरलहोत असून या व्हिडिओमध्ये आमदार गावकऱ्यांना म्हणत आहेत, की मुलाची शपथ घेऊन सांगा की तुम्ही भाजपल मतदान केलं आहे. तुम्ही शपथ घेतली तरच वीज जोडली जाईल.
समोर आलेल्या माहितीनुसार आमदार वीर विक्रम सिंह एका गावात वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी झाले होते. यादरम्यान एका गावकऱ्यानं त्यांच्याकडे वीज जोडण्याची मागणी केली. यावर उत्तर देताना आमदार गावकऱ्यांना म्हणाले, की तुमच्या गावात आम्हाला मतं मिळाली नाहीत. त्यामुळे तुम्हाला लाईट मिळणार नाही. तुम्ही मला मत दिलेले नाही त्यामुळे माझ्याकडून अपेक्षा ठेऊ नका.
उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) के #शाहजहांपुर (Shahjahanpur) से @BJP4UP #विधायक वीर विक्रम सिंह (MLA Veer Vikram Singh) का एक वीडियो वायरल (Video Viral) हो रहा है. इसमें वह कह रहे हैं कि बेटे की कसम खाकर कहो कि बीजेपी को वोट दिया, तभी लाइट लगवाउंगा. pic.twitter.com/pocLOWkPVi
— Satya Tiwari (@SatyaTi50606386) July 13, 2021
पुढे आमदार महोदय म्हणतात की, आपल्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घे आणि सांग की तू भाजपला मतदान केलं आहे. तरच मी तुम्हाला वीज जोडून देईल. याचबरोबर, ज्यावेळी गावकऱ्यांनी आपली तक्रार असल्याचे सांगितलं, त्यावेळी आमदार म्हणाले, की ‘तुम्ही ज्याला मतदान देता, त्याच्याकडे तक्रार करा. जर तुम्ही मला मत दिले असते तर तुम्हाला माझ्या छातीवर चढण्याचा अधिकार आहे. तुम्ही आम्हाला फसवण्याचा प्रयत्न करु नका असे वक्तयांव त्या व्हिडिओमध्ये करताना दिसत आहे. सध्या या व्हिडिओमुळे आमदार महोदयांवर घणाघाती टीका होताना दिसत आहे.