मलायका अरोरा आपल्या नात्यामुळे चांगलीच चर्चेत असते. मलायकाचे पहिले लग्न सलमान खानचा भाऊ अरबाज खान सोबत झाले होते.अरबाज खान आणि मलायका अरोरा हे बॉलिवूडमधील पॉवर कपल्सपैकी एक होते पण काही कारणांमुळे दोघांनीही वेगळे होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतरही मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचे नाते अरबाज खान आणि त्याच्या कुटुंबाशी एक ना एक प्रकारे जोडलेले राहिले.
मलायका अरोराबाबत, इंडस्ट्रीमध्ये लोक अनेकदा म्हणायचे की मलायकाचे करिअर घडवण्यामागे सलमान खानचा हात आहे. यावर संतापलेल्या मलायकाने जोरदार प्रत्युत्तर दिले. खरं तर, ड्रामा क्वीन राखी सावंतने मलायका अरोराची खिल्ली उडवली आणि म्हटले की, सलमान खानच्या कुटुंबातील असल्याने मलायका अरोराला आयटम गर्लचा टॅग कधीच लागला नाही.
मलायका अरोराबद्दल बोलताना राखी सावंत म्हणाली होती की, खान कुटुंबाशी असलेल्या नात्यामुळे तिला इंडस्ट्रीत अनेक संधी मिळाल्या आहेत. राखी सावंतचा व्हिडिओ पाहिल्यानंतर मलायकाचा राग अनावर झाला आणि म्हणाली, असे झाले असते तर मी सलमान खानच्या प्रत्येक चित्रपटात एक आयटम साँग करायला हवे होते. मलायका म्हणाली, ‘मी सेल्फ मेड आहे आणि सलमान खानने मला बनवले नाही…’ असं प्रतिउत्तर राखी सावंत हिला दिले आहे.