सतत आपल्या वादग्रस्त विधानाने चर्चेत राहणारे तसेच थेट राष्ट्रपती पदावर आपला हक्क सांगणारे बिगगबॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी थेट आता राजकारणात मोठे विधान केले आहे एकीकडे शिवसेनेने महाराष्ट्राची पुढील मुख्यमंत्री महिला असेल असंविधान करून शिंदे-फडणवीस सरकारला आव्हान दिलेले असताही आता अभिजीत बिचुकलेने आपल्या पत्नीला मुख्यमंत्री बनवण्याचा इरादा बोलून दाखवला आहे. या त्यांच्या विधानाने आता नव्या चर्चाना उधाण आले आहे.
अभिजीत बिचुकलेनं नुकताच लग्नाचा वाढदिवस साजरा केला. त्यानिमित्त त्यानं पत्नी अलंकृता बिचुकले यांना जाहीर पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या. अभिजीत बिचुकलेनं पत्राचं शिर्षक दिलं होतं, ‘महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री’. याविषयी माध्यमांशी बोलताना बिचुकलेनं सांगितलं, ‘मी हे पहिल्यांदाच बोललो नाही. आमच्या सौभाग्यवतींनी 2009 मध्ये उदयनराजेंविरुद्ध पहिली लोकसभा निवडणूक लढवली तेव्हा साताऱ्यात पत्रकार परिषदेत मी हे बोललो होतो.
स्वातंत्र्यापासून या क्षेत्रावर नेहमीच पुरुषांची मक्तेदारी राहिली आहे.’ ‘मुख्यमंत्री होऊ इच्छिणाऱ्या महिलेला भारतीय संस्कृतीची पूर्ण माहिती असायला हवी, असेही ते म्हणाले. संपूर्ण भारताला ती संस्कृती जपणाऱ्या आणि चालवणाऱ्या गृहिणीची गरज आहे आणि माझी पत्नी अलंकृता बिचुकले ही महाराष्ट्राचे सौंदर्य, संस्कृती आणि प्रतिष्ठा जपणारी आहे. मी स्वत: संपूर्ण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाताना हा मुद्दा मांडणार आहे, असंही बिचुकलेनं सांगितलं. दरम्यान, अभिजीत बिचुकलेनं शाहरुख खानच्या पठाण चित्रपटातील लूकबाबत वक्तव्य केलं होतं.
अभिजीत बिचुकले म्हणाला होता, ‘शाहरुख खानचा पठाणमधील लूक माझ्यासारखा दिसतो. ही एक सकारात्मक गोष्ट म्हटली पाहिजे. बिग बॉसमध्ये माझी अशीच हेअरस्टाईल होती. 1991 मध्ये मी लहान होतो तेव्हा संजूबाबा संजय दत्तचे लांब केस होते.