मराठा आरक्षण, १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद….मराठा समाजाच्या गोलमेज परिषदेत विविध पंधरा ठराव मंजूर

मराठा आरक्षण, १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद….मराठा समाजाच्या गोलमेज परिषदेत विविध पंधरा ठराव मंजूर

ग्लोबल न्यूज : सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिली आणि त्यानंतर राज्यातील अनेक ठिकाणी मराठा समाज संघटनांकडून आंदोलने करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर बुधवारी कोल्हापूरमध्ये मराठा समाजाच्या राज्यव्यापी गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

यात, मराठा आरक्षण प्रश्नी १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद पुकारण्याचा निर्णय मराठा समाजाच्या राज्यस्तरीय गोलमेज परिषदेत बुधवारी घेण्यात आला. या परिषदेला राज्यातील अनेक मराठा संघटनांचे नेते आणि प्रतिनिधींची उपस्थिती होती. यावेळी समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचे असे जवळपास १५ ठराव या परिषदेत मंजूर करण्यात आलेले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेली अंतरिम स्थगिती उठवावी आणि समाजाला पूर्ववत आरक्षण मिळायला हवे, समाजातील विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या चालू शैक्षणिक वर्षातील फीसचा परतावा शासनाने द्यावा, केंद्र सरकारच्या आर्थिक दुर्बल घटकांसाठीच्या आरक्षणाचा लाभ समाजाला मिळावा, यासाठी राज्य सरकारने अध्यादेश काढावा, असे पंधरा ठराव या परिषदेत मंजूर करण्यात आले आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: