शिंदे -फडणवीस सरकार विरोधात महाविकास आघाडीने सभा घेण्याचा सपाटा लावला आहे आहे, अशातच नागपुरात मविआची सभा होणार आहे. मात्र या सभेपूर्वी हालचालींना वेग आला आहे. मविआच्या सभेपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख मुंबईला रवाना झाले आहेत नागपुरात होणाऱ्या वज्रमूठ सभेच्या स्थळाची पाहणी आज अनिल देशमुख हे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसोबत करणार होते. मात्र पहाणी रद्द करून अनिल देशमुख मुंबईला रवाना झाले आहेत.
आता अनिल देशमुख मुंबईला का गेले याचं कारण अस्पष्ट आहे, मात्र महत्त्वाच्या कामासाठी मुंबईला गेले असल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे आता मविआमध्ये समन्वयाचा अभाव आहे का? असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होत आहे. चर्चेला उधाण नागपुरात होणारी मविआची सभा विविध कारणांमुळे चर्चेत आली आहे. पूर्वी या सभेला भाजपने विरोध केला होता. ही सभा जिथे होणार आहे तिथे खेळाचे मैदान असल्याचं भाजपने म्हटलं होतं.
भाजपकडून सुरू असलेल्या विरोधामुळे ही सभा चर्चेत आली होती. आता पुन्हा एकदा ही सभा चांगलीच चर्चेत आली आहे. सभेपूर्वी मविआचे नेते सुनील केदार, विनायक राऊत यांनी या मैदानाची पहाणी केली होती. आज अनिल देशमुख या मैदानाची पहाणी करणा होते. मात्र त्यापूर्वीच अनिल देशमुख मुंबईला रवाना झाल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. बावनकुळेंचा इशारा दरम्यान दुसरीकडे या सभेवरून भाजपने पुन्हा एकदा मविआला इशारा दिला आहे. या सभेला आमचा विरोध नाही, मात्र वयक्तिक टीका खपवून घेतली जाणार नाही. जे काही बोलायचं आहे ते पक्षाच्या धोरणावर बोला, राज्यावर बोला असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.