महाराष्ट्रातलं ‘वसुली सरकार’ कोरोना संकटाबाबत गंभीर नाही – हर्ष वर्धन

नवी दिल्ली : केंद्राकडून महाराष्ट्राला पुरेशा प्रमाणात लसीचा साथ पुरवला जात नाही असा आरोप ठाकरे सरकारकडून करण्यात आला होता. मात्र राज्य सरकारकडून लावण्यात आलेले आरोप केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी फेटाळून लावले असून राज्य सरकारवर पत्रक काढून टीका केली आहे.

डॉ. हर्षवर्धन यांनी यासंदर्भात एक प्रसिद्धिपत्रक जारी केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे, ‘कोरोना विषाणूशी लढत असताना महाराष्ट्र सरकारच्या चुकीच्या कारभाराचा आणि प्रासंगिक दृष्टीकोनाचा मी स्वत: साक्षीदार आहे. राज्य सरकारच्या अशा अभावांमुळेच संपूर्ण देशाच्या कोरोना विरुद्ध लढण्याच्या मोहिमेला फटका बसला आहे.

तसेच केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमितपणे समुपदेशन केले. त्यांना सर्व साधनसामुग्री उपलब्ध करून दिली. तसंच मदतीसाठी केंद्रीय पथके पाठवली. पण आता महाराष्ट्र सरकारच्याच प्रयत्नांमध्ये अभाव असल्याचे स्पष्ट दिसते आहे अशी टीका हर्ष वर्धन यांनी केली आहे.

सरकार ‘वैयक्तिक वसुली’ करण्यासाठी इन्स्टिट्युशनल क्वारंटाईनमधून सवलत देत आहे. यामुळे महाराष्ट्रातील जनतेचा धोका वाढत आहे, हे पाहणं धक्कादायक आहे. एकंदरीतच, राज्य एका संकाटातून दुसऱ्या संकटात अडकले आहे. दुसरीकडे राज्याचं नेतृत्व आनंदाने आराम करत असल्याचं दिसतं आहे.

Team Global News Marathi: