Tuesday, May 30, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोजकेच जगा आणि आनंदी रहा… वाचा सविस्तर काय आहे नेमकी पद्धत

by ग्लोबल न्युज नेटवर्क
August 16, 2020
in आरोग्य, सुविचार
0
मोजकेच जगा आणि आनंदी रहा… वाचा सविस्तर काय आहे नेमकी पद्धत

आपण स्वतःजवळ उगीच नको त्या गोष्टी बाळगत असतो. 

Minimalism: किमान चौकटीत राहण्याची जीवनशैली.

मनोज कुरुंभटीफ

काही दिवसांपूर्वी ‘minimalist’ हे पुस्तक वाचायचा योग आला.
Joshua fields Millburn आणि Ryan Nocodemus ह्या दोघांनी लिहिलेले छान पुस्तक आहे.

Minimalist म्हणजे किमान चौकटीत राहण्याची जीवनशैली.आजकालची तरुण पिढी ही जीवनशैली आत्मसात करताना दिसते.

आपण आयुष्यात उगीच नको त्या गोष्टी स्वतः सोबत बाळगत असतो आणि त्या गोष्टींच्या मालकी हक्कापायी आपले स्वतःचे स्वातंत्र हिरावतो.

रोजच्या जीवनात लागणाऱ्या अत्यावश्यक बाबींचा विचार करता असे लक्षात येते की काही मोजक्या गोष्टी व्यतिरिक्त आपण उगाच फाफट पसारा घेऊन जगात असतो. त्या अनावश्यक गोष्टींचे ओझे बाळगताना जगण्याचा खरा आनंदच विसरतो.

‘ The secret of happiness is not found in seeking more but in developing the capacity to enjoy less–Socrates

जीवनाचा खरा आनंद जास्तीत जास्त गोष्टी जतन करण्यात नसून कमीत कमी गोष्टी बाळगून गरजा कमी करण्यातच खरा आनंद आहे.

आपण घरात किती अनावश्यक गोष्टी सांभाळत असतो. एखादी गोष्ट कधीतरी पुढे लागेल हया आशेवर तिला अनावश्यक सांभाळत असतो आणि असे करताना घरात अनावश्यक गोष्टी साठवत असतो. खरं तर, घर ही ‘आनंदाने जगण्याची’ जागा आहे त्याला आपण ‘साठवणीची जागा ‘ बनवतो.

Actually home is ‘living space’,not a ‘storing space’

किमान चौकटीची जीवनशैलीनुसार, जी वस्तू तुम्ही गेल्या सहा महिने वा वर्षभरात वापरली नसेल ती वस्तू तुमच्या दृष्टीने निरुपयोगी आहे. अशी वस्तू त्वरित कोणा योग्य माणसाला देऊन टाकावी अथवा त्याची विल्हेवाट लावावी. अन्यथा ती वस्तू अडगळ म्हणूनच राहते. तुम्हाला जीवन जगतांना जास्तीत जास्त सुमारे 100 वस्तूंची अत्यंत गरज बाकी इतर वस्तू अनावश्यक असतात.
They are just stuff.

‘ Less stuff then more freedom’

आपले घर ‘राहते घर ‘ असावे का अडगळीची खोली हे सर्वस्वी आपल्या सवयीवर अवलंबून असते.

खरं तर तुमच्या गरजा कमी करून तुम्ही जास्तीत जास्त समृद्ध होत असतात. गरजा आणि वस्तूंचा संचय जितका कमी तितके त्या निर्जीव वस्तूत असलेली गुंतवणूक कमी. त्या निर्जीव वस्तूंचा सांभाळ करताना जो वेळ आणि कष्ट तुम्ही घेतात त्यामुळे जीवनाचा खरा आनंद उपभोगु शकत नाही.

आजकाल घरात तीन television sets असतात. एक हॉल मध्ये, एक घरातील सिनियर सिटीझनच्या खोलीत आणि एक मुलांच्या खोलीत. खरंच ह्या तीन टीव्हीची गरज आहे का? ह्यामुळे कुटुंब तीन खोल्यांमध्ये विभागले गेले आणि त्यातील संवाद संपलाय.

प्रत्येक जण आपल्या आवडता कार्यक्रम पाहण्यात मश्गुल मात्र एकत्र बसून गप्पा, विचार विनिमय ह्या गोष्टींना मुकलाय. तीच गोष्ट गाडीच्या बाबत घरात माणसं तेवढ्या गाड्या असतात. मग त्या वस्तूची देखभाल आणि त्यासाठी लागणारा अनावश्यक वेळ आणि खर्च ह्याचा विचार व्हायला हवा.

खरं तर आपण जेवढया गोष्टी जमवतो तेवढा वेळ त्या गोष्टी आवरण्यासाठी देतो. घरातील पसारा आवरताना ह्या गोष्टींची प्रकर्षाने जाणीव होते.

त्यामुळे Owning less is better than organising more’ ही उक्ती यथार्थ वाटते.

आता लोक फिरायला जातात तेथील नवीन जागा, निसर्ग सौंदर्य, सहलीची आठवण इ. बाबींचे मनात साठवण करण्याऐवजी तेथील विक्रीला असलेल्या वस्तू घेण्याकडे सगळ्याचा कल असतो. खरे तर त्या वस्तूंचा वापर घरी आल्यावर खचितच केला जातो मात्र त्या वस्तू विकत घेऊन घरात अडगळ मात्र वाढवतो.

त्यामुळे प्रवासातील महत्वाचे तत्व म्हणजे ‘ Collect moments, not the things.’
खरं तर वस्तूंचा संचय आणि त्याची साठवण ह्यापेक्षा ते श्रम आणि पैसा भटकंती वरती खर्च करावा. प्रवास आपल्याला नवनवे अनुभव देतो आणि आत्मविश्वास वाढवतो त्यामुळे “”प्रवासात वस्तूंची खरेदी करण्याऐवजी अनुभवांची साठवण करावी.”‘

आता किमान जीवन शैली अवलंबताना काय करावे, घरातील अनावश्यक वस्तू, एक तर गरजू लोकांना देऊन टाकाव्यात. कदाचित आपल्या घरातील ‘अडगळ’ ही दुसऱ्याच्या ‘जगण्याची निकड’ असू शकते. तसेच त्यामुळे दातृत्वाची सवय लागते.

आजकालच्या लग्न समारंभात अवलंबलेली चांगली पद्धत म्हणजे ‘आहेराचा’ स्वीकार न करणे. पूर्वी लग्न समारंभात ‘आहेर ‘ ह्या प्रथेपायी इतक्या अनावश्यक गोष्टींची घरात बरसात होत असे की त्याचा वर्षानुवर्षे संचय होत असे आणि मग हळूहळू त्या वस्तू पुन्हा अडगळीच्या खोलीत जात.

घरातील अडगळ ही नकारात्मक ऊर्जा उत्पन्न करते. अश्या अडगळीच्या वस्तूने घरातील आनंद, सुख जणू हिरावल्यासारखे वाटते. त्यासाठी वेळोवेळी ही अडगळ कमी करायला हवी.

‘ The more I threw away, the more I found’

‘ when your home is clean and uncluttered, you have no choice but to examine your inner state’

Minimalism is asking ‘why’ before you ‘ buy.’

खरंच एखादी गोष्ट विकत घेण्याआधी , ती वस्तू का घेतो आणि त्याची खरंच गरज आहे काय? ह्याचे समर्पक उत्तर मिळणे गरजेचे आहे.

We move closer to what we love when we walk away from what we don’t love.

आइनस्टाइन ने तीन नियम सांगितले आहेत.

1. Out of clutter, find simplicity

2. From discord,find Harmon.

3. In the middle of difficultly lies opportunity.

Minimalism म्हणजेच किमान चौकटीत जगण्याची जीवन शैली अवलंबताना तुम्ही अनावश्यक वस्तूंचा त्याग करता त्यावेळी त्या वस्तू दान करण्याचे औदार्य पण दाखवता.

It is letter to donate than accumulate.

वस्तूंचा अनावश्यक संचय करण्यापेक्ष्या त्याचे सत्पात्री दान करणे गरजेचे आहे.

A home with fewer possession is more spacious, more calming and more focused on the people whom live inside it.

आजकालच्या जगात घरातील वृद्ध माणसांशी बोलायला , त्यांच्याशी संवाद साधायचा वेळ नसतो कारण प्रत्येकजण मोबाईल,टीव्ही, इंटरनेट इ बाबींमध्ये अडकलाय आणि घरातील अनावश्यक वस्तूंमध्ये गुंतलाय. ह्या अनावश्यक वस्तूंची ‘अडगळ’ कमी केली तरच घरातील वृद्ध व्यक्तींशी सुसंवाद साधता येईल आणि त्या वृद्ध व्यक्तींची ‘अडगळ’भासणार नाही.

Accept Minimalism as lifestyle, an art of letting go.

Too many peoples spend money they have not earned, to buy things they don’t want, just to impress people they don’t like.”

वरील वाक्याकडे तटस्थपणे आणि गांभीर्याने बघितले तर खरोखर आजकाल मध्यमवर्गीय समाजात एक चंगळवाद वाढत चाललाय ज्यामुळे ज्या गोष्टी घेण्याची आज ऐपत आणि गरज नाही त्या वस्तू अगदी कर्जाने विकत घेऊन लोकांमध्ये मिरवण्यासाठी वृत्ती आढळते.अगदी ‘ऋण काढून सण साजरे करावे’ ह्यासाठी अहमहमिका लागते. तसे बघितले तर ज्या गोष्टींची आज गरज नाही त्या गोष्टींचं मूल्य ‘शून्य’ असते. कारण वस्तूचा वापर असेल तरच तिची उपयुक्तता.

ह्या जीवनशैलीचे अनेक फायदे आहेत, जसे
1. घरातील अनावश्यक वस्तूंचा पसारा कमी होऊन घर सुटसुटीत आणि स्वछ राहते.

2. वस्तू सांभाळणे आणि त्याची देखभाल ह्यावर लागणाऱ्या श्रमाची आणि पैशाची बचत होते.

3. निर्जीव वस्तूपेक्षा सजीव व्यक्तींमध्ये म्हणजेच आपले आप्त लोक ह्यांच्याशी जास्तीत जास्त वेळ घालवता येतो.

4. तुमच्या आरोग्याकडे जास्त लक्ष देऊ शकतात.

5. कमी ताणतणाव आणि अतिरिक्त वेळेची उपलब्धता ज्याचा विनियोग चांगला छंद जोपासण्यासाठी करू शकता.

6. वेळेची आणि पैशाची बचत होते.

ह्या बाबींचा विचार करता mimimalistic lifestyle ही एक नवीन जीवनशैली न राहता काळाची गरज असल्याचे द्योतक आहे.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: जीवनमोजकेच जगणेसुविचार
ADVERTISEMENT
Next Post
आनंदवार्ता: बीड जिल्ह्यात चागला पाऊस; बिंदुसरा प्रकल्प 98 भरला

आनंदवार्ता: बीड जिल्ह्यात चागला पाऊस; बिंदुसरा प्रकल्प 98 भरला

Recent Posts

  • पंडित नेहरू नंतर नरेंद मोदींच्या हातात येणार राजदंड
  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • युवकांचे आत्महत्येचे प्रमाण चिंताजनक….
  • राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group