मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी राज्यातील जनतेशी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी वाढत असलेली रुग्णसंख्या राज्यात पुन्हा एकदा राज्याला लॉकडाऊनच्या उंबरड्यावर आणूं ठेवले आहे असे भाष्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. तसेच लॉकडाऊन शिवाय दुसरा पर्याय नसल्याचे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखविले होते.
आता मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक लाईव्हनंतर मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन मुख्यमंत्र्यांच्या लाईव्हची एकप्रकारे खिल्लीच उडवली आहे. ‘मुख्यमंत्री साहेब, तुमचं ऐकलं, आता आमचं ऐका…किंबुहना ऐकाच ! आज (३ एप्रिल) सकाळी ११ वाजता फेसबुक लाईव्ह.’, असे ट्विट देशपांडे यांनी केलं आहे.
मुख्यमंत्र्यांच्या भाषेचा आपल्या ट्विटमध्ये उल्लेख करत, त्यांनी ११ वाजता फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून उत्तर देणार असल्याचे सूचवले आहे. त्यामुळे संदीप देशपांडे शिवसेनेवर काय आरोप करणार आणि कसा प्रकारे त्यांचे पितळ उघड करणार हे आता पाहावे लागणार आहे.
मुख्यमंत्री साहेब, तुमचं ऐकलं, आता आमचं ऐका…किंबुहना ऐकाच ! उद्या सकाळी 11 वाजता फेस बुक लाईव्ह.
Sandeep Deshpande Adhikrut
या फेसबुक पेजवर— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) April 2, 2021