कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिर अद्याप बंद ठेवण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे मंदिरे उघडी करण्यासाठी भाजपा पाठोपाठ मनसेने सुद्धा आंदोलनाचा इशारा दिला आहे. मात्र आता खास VIP व्यक्तींसाठी सिद्धिविनाय मंदिराच दार उघडण्यात आल्याचा आरोप मनसेने लगावत आहे. तसेच पुरावे देखील सादर केले आहे. त्यामुळे सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते आदेश बांदेकर यांच्यावर मनसेने तोफ डागली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार काल (३१ ऑगस्ट) शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे, निर्माती-दिग्दर्शक एकता कपूर यासारख्या व्हिआयपी लोकांना दर्शन देण्यात आल्याचे पुरावे नोंद वही आणि सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. यावरूनच आता मनसेने महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. ‘कुणी कुणाचा नाद करायचा, हे ठरवणं सोपं जाईल,’ असं मनसेने म्हटलं आहे. तसेच या प्रकरणासंदर्भात सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते आदेश बांदेकर हे कोणाच्या आदेशाने करतात याची चौकशी करण्याची मागणीही केली आहे.
मनसेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनीही या प्रकरणावरुन टीका केली आहे. ‘घंटानाद करा किंवा आणखी कुठला नाद करा, पण आमचा नाद करू नका’ असं म्हणणाऱ्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांचे दात त्यांच्याच- शिवसेनेचे खासदार श्री. राहुल शेवाळे यांच्या पराक्रमाने- घशात अडकले आहेत. खासदार शेवाळे, सेलिब्रिटी निर्माती एकता कपूर यांसारख्या व्हीआयपींना सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी मागच्या दाराने प्रवेश देणारे न्यासाचे अध्यक्ष श्री. भावोजी बांदेकर हा प्रकार शिवसेनापक्षप्रमुख- मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या ‘आदेशा’ने करतात का? असा प्रश्न विचारण्यात आला आहे.
सिद्धिविनायक मंदिरात व्हीआयपीना प्रवेश!!
'लोकसत्ता डॉटकॉम'चा हा न्यूज व्हिडिओ बघाच.
कुणी कुणाचा नाद करायचा, हे ठरवणं सोपं जाईल!सविस्तर वाचण्यासाठी : (फेबु लिंक)https://t.co/iYmPyAxh20
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) September 1, 2021