कोरोनाचा धोका वाढताच, जागतिक आरोग्य संघटनेने दिला हा इशारा

 

जगभरातील कोविड-19 विषाणूचा धोका अद्याप टळलेला नाही. जगभरात अद्यापही कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. युरोपमध्ये गेल्या सहा आठवड्यांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण तीन पटीनं वाढल्याचं समोर आलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने 19 जुलै रोजी ही आकडेवारी जाहीर केली आहे.

तसेच हे प्रमाण जगभरातील कोरोना संसर्गाच्या 50 टक्के आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्यादेखील दुप्पट झाली आहे. दरम्यान, दिलायादाक बाब म्हणजे अतिदक्षता विभाग (ICU) भरती होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे युरोपचे संचालक डॉ. हंस क्लूज यांनी युरोपमधील वाढत्या कोरोना संसर्गावर चिंता व्यक्त केली आहे.

डॉ. हंस क्लूज यांनी म्हटलं आहे की, कोरोना भयानक संभाव्य घातक आजार आहे. या आजाराकडे दुर्लक्ष न करण्याचं आवाहन केलं आहे. युरोपमध्ये गेल्या दीड महिन्यांमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण तीन पटीनं वाढलं आहे. युरोपातील वाढत्या कोरोना संसर्गामुळे आरोग्य व्यवस्थेच्या चिंते भर पडली आहे.

Team Global News Marathi: