कोरोनामुळे १२ कोटी लोक बेरोजगार, मात्र अब्जाधीशांच्या संपत्तीत ३५ टक्यांनी वाढ

कोरोनामुळे १२ कोटी लोक बेरोजगार, मात्र अब्जाधीशांच्या संपत्तीत ३५ टक्यांनी वाढ

कोरोनाच्या संकटाने देशाच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले. जवळपास १२ कोटी लोकांच्या नोकऱ्या जाऊन ते बेरोजगार झाले. त्याचवेळी देशातील सर्वात श्रीमंत १०० अब्जाधीशांच्या संपत्तीत मात्र १३ टक्यांनी वाढ झाली आहे. ऑक्सफॅम या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या ‘द इनइक्वॅलिटी व्हायरस’ म्हणजेच विषमतेचा विषाणू या अहवालात ही धक्कादायक माहिती देण्यात आली आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग आणि त्यासाठी करावा लागलेला लॉकडाऊन यामुळे एकीकडे कोट्यवधी लोक बेरोजगार झाले आहेत, तर दुसरीकडे सर्वात श्रीमंत अब्जाधीशांच्या संपत्तीत मात्र ३५ टक्के वाढ झाली आहे, असे या अहवालात म्हटले आहे.

भारतातील सर्वात श्रीमंत १०० अब्जाधीशांच्या संपत्तीत १२.९७ रुपायांची वाढ झाली आहे. ही रक्कम एवढी आहे की, देशातील प्रत्येक नागरिकाला त्यातून ९४ हजार ४५ रुपये दिले जाऊ शकतात. दुसरीकडे एप्रिल २०२० मध्ये प्रत्येक तासाला १ लाख ७० हजार लोकांचे रोजगार, नोकऱ्या किंवा कामधंदा हातातून गेला आहे.

कोरोना काळात देशातील सर्वात श्रीमंत शंभर अब्जाधीशांपैकी पहिल्या ११ अब्जाधीशांनी जो पैसा कमवला त्यातून मनरेगा योजना १० वर्षे चालवली जाऊ शकते किंवा आरोग्य विभागाचा १० वर्षांचा खर्च भागवला जाऊ शकतो. ऑक्सफॅमच्या अहवालातील सर्वात चिंतेची बाब म्हणजे ही आर्थिक विषमता आणखी वाढेल, असे सांगण्यात आले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: