ईडीने आज शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांची संपत्ती जप्त केलीआहे. त्यामध्ये दादर याठिकाणी असणारा एक फ्लॅट तर अलिबागमध्ये असणाऱ्या ८ जागांचा समावेश आहे प्रविण राऊत यांच्या अटकेनंतर ईडीने ही कारवाई केली आहे. १,०३४ कोटी रुपयांच्या पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांची ही मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
भाजप नेते किरीट सोमय्यांनी संजय राऊतांवर झालेल्या कारवाईनंतर अनेक आरोप केले. यावर प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांची जीभ घसरल्याचं पहायला मिळालं. किरीट सोमय्या चु*** आहे. महाराष्ट्रद्वेष्टा आहे. जो माणूस मराठीच्या विरोधात कोर्टात जातो, तो आम्हाला अक्कल शिकवणार का? कोण आहे तो?’, अशा हल्लाबोल राऊतांनी केला आहे.
दरम्यान, अशा कारवायांनी संजय राऊत किंवा शिवसेना झुकणार नाही, वाकणार नाही. याच घरात येऊन काही महिन्यांपूर्वी भाजपाच्या लोकांनी महाराष्ट्रातलं सरकार पाडण्यासाठी मदत करा, अशा धमक्या दिल्या होत्या. असंही राऊत म्हणाले. आता राऊत यांच्या या टीकेला भाजपा काय प्रतिउत्तर देते हे पाहावे लागणार आहे.