मला लाथ मारा, पण बंगालच्या विकासाला लाथाडू नका! पंतप्रधान मोदीं

ग्लोबल न्यूज:विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आसाम आणि पश्चिम बंगालचा दौरा केला. या दौऱयावेळी बांकुडा येथील प्रचारसभेत बोलताना त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जींवर टीका केली. माझ्या डोक्यावर पाय ठेवा, मला लाथ मारा, पण बंगालच्या विकासाला लाथ मारू नका. मी तुम्हाला बंगालच्या स्वप्नांना लाथ मारू देणार नाही, असे मोदींनी ममतादीदींना सुनावले.

रविवारी सकाळी आसामच्या बोकाखाट येथे पहिली सभा घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी सायंकाळी बांकुडा येथील सभेला पोहोचले होते. या सभेत बंगालमध्ये परिवर्तन घडवणार असल्याचा पुनरुच्चार मोदींनी केला.

तसेच तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांच्या घरात लागलेल्या छायाचित्रांवर त्यांनी टिप्पणी केली. या छायाचित्रांमध्ये दीदी, माझ्या डोक्यावर आपला पाय मारत आहे. माझ्या डोक्याबरोबर फुटबॉल खेळत आहे. तुम्ही बंगालचे संस्कार आणि इथल्या महान परंपरेचा अपमान का करीत आहात, दीदी? हा बंगाल तर देशाला दिशा देणारा आहे.

 

दीदी, माझी दुसरी गोष्टही कान उघडे ठेवून ऐका. तुम्ही हवे तर मला लाथ मारू शकता, परंतु मी तुम्हाला बंगालच्या स्वप्नांना लाथ मारू देणार नाही, असे मोदींनी नमूद केले. ‘2 मई, दीदी गई’ असा पक्का निर्धार बंगालच्या जनतेने केल्याचेही ते म्हणाले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: