केरळ राज्य सरकारने रेमडेसिवीरचे 1 लाख डोसही केंद्राला केले परत

संपूर्ण देशात कोरोना रुग्णसंख्या झपाटयाने वाढताना दिसत आहे. त्यात कोरोनाला रोखण्यासाठी प्रभावी ठरेलेले रेमडेसिवीर औषधाचे केंद्र सरकारकडून संपूर्ण राज्यांना वाटप करण्यात आलेले आहे. आज महाराष्ट्र राज्यसारख्या मोठया जिल्ह्यामध्ये मोठया प्रमाणात रेमडेसिवीर औषधाचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यात केंद्र सरकारकडून अल्प प्रमाणात रेमडेसिवीरचा पुरवठा होताना दिसत आहे. त्यातच आता केरळ राज्याने १ लाख रेमडेसिवीर औषध केंद्र सरकारला परत केले आहे.

कोरोना संसर्गाचा चांगल्या प्रकारे सामना केलेल्या केरळ सरकारने आणखीन एक चांगली कामगिरी केली आहे. केरळ सरकारनं केंद्र सरकारकडे न वापरलेले रेमडेसिवीरच्या इंजेक्शनचे 1 लाख डोस परत केले आहेत. खात्रीदायक सूत्रांनी बुधवारी ही माहिती दिली. केरळ सरकारनं रेमेडिसवीरचे डोस केंद्राकडे परत केले आहेत, जेणेकरून हे औषध आवश्यक असलेल्या राज्यांमध्ये पुन्हा वाटप करता येतील. महत्त्वाचे म्हणजे केरळ सरकारनं रेमडेसिवीर औषध अशा काळात परत करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यावेळी इतर राज्यांमध्ये या औषधासाठी कमतरता भासत आहे. त्यामुळं त्यांच्या या निर्णयाचं कौतुक होत आहे.

गेल्या आठवड्यातच रेमडेसिवीर औषधाची पुरेशी उपलब्धता व्हावी, यासाठी केंद्र सरकारनं 16 मेपर्यंत सर्व राज्यांना या औषधाचं वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. केंद्रीय रसायन व खते मंत्री सदानंद गौडा यांनी हा निर्णय घेतला व औषध विभाग आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने संयुक्तपणे राज्यांमध्ये औषध वाटप करण्याची योजना तयार केली. केंद्रीय रसायन व खते मंत्रालयाने 21 एप्रिल ते 16 मे दरम्यान राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना 53 दशलक्ष रेमडेसिवीरचे डोस देण्याचे ठरवले आहेत. या औषधाचा कोरोना उपचारात फायदा होत असून ते कोरोनावर प्रभावी ठरत आहे.

Team Global News Marathi: