Tuesday, May 30, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली वाहन चालकांसाठी महत्वाची माहिती

by Team Global News Marathi
March 10, 2022
in नवी दिल्ली
0
आजवर महाराष्ट्राचा एकही नेता पंतप्रधान का झाला नाही? गडकरी म्हणतात की

केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी कार, मोटारसायकल, स्कूटर किंवा इतर कोणत्याही प्रकारचे वाहन चालवणाऱ्यांसंदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे.त्यांनी नुकतेच सांगितले की, भारतात दरवर्षी ५ लाख रस्ते अपघात होतात, हे प्रमाण जगातील सर्वाधिक अपघातांपैकी एक आहे.या अपघातांमध्ये सुमारे १.५ लाख लोकांचा मृत्यू होतो, तर जवळपास ३ लाख लोक गंभीर जखमी होतात. गडकरी म्हणाले, दुर्देवाची गोष्ट म्हणजे ७० टक्के मृत्यू हे १८ ते ४५ वयोगटातील लोकांचे होतात. रस्ते सुरक्षा ही आमच्या सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे.

गडकरी म्हणाले, अपघातांची शक्यता कमी करण्याच्या दृष्टीने ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिमसोबतच AI-आधारित तंत्रज्ञानाचीही आवश्यकता आहे. तसेच, रस्ते सुरक्षा हा जगभरात चिंतेचा विषय असून भारतासारख्या विकसनशील देशांसाठीही हे एक आव्हान आहे. या रस्ते अपघातांच्या फॉरेन्सिक तपासणीसाठी एआय-आधारित ड्रोन आणि रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकतो, असेही गडकरी यांनी म्हटले आहे.

गडकरींच्या मते, मागणी आणि पुरवठा यांच्यातील असंतुलनामुळे वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण होतो. अशा परिस्थितीत एआय आधारित साधनांच्या मदतीने रहदारीच्या स्थितीची अचूक तपासणी, विश्लेषण आणि तिचा अंदाज लावला जाऊ शकतो. याशिवाय, भारतीय महामार्गांवर एक प्रगत अशी वाहतूक व्यवस्था प्रणाली तयार करण्यात आली आहे. यात इलेक्ट्रॉनिक सेन्सर्स आणि एचडी कॅमेऱ्यांच्या मदतीने डेटा संकलित केला जातो, असेही गडकरी म्हणाले.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post
मणिपुरात भाजप-काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर, दोन्ही पक्ष ४-४ जागांवर आघाडीवर

मणिपुरात भाजप-काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर, दोन्ही पक्ष ४-४ जागांवर आघाडीवर

Recent Posts

  • पंडित नेहरू नंतर नरेंद मोदींच्या हातात येणार राजदंड
  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • युवकांचे आत्महत्येचे प्रमाण चिंताजनक….
  • राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group