कौतुकास्पद | ऑस्ट्रोलियत ‘एससीजी’ प्रवेशद्वाराला सचिन तेंडुलकरचे नाव

 

मुंबई | सिडनी क्रिकेट ग्राउंडमध्ये (एससीजी) एका प्रवेशद्वाराला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे नाव देण्यात आले असून सर्व भारतीयांसाठी अभिमानाची बाबा आहे. सचिनच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त या प्रवेशद्वाराचे अनावरण सोमवारी करण्यात आले.सचिनने सोमवारी आयुष्याचे ‘अर्धशतक’ साजरे केले. त्याने ‘एससीजी’मध्ये ५ कसोटी सामने खेळताना १५७च्या शानदार सरासरीने ७८५ धावा काढल्या आहेत. त्यामध्ये त्याची नाबाद २४१ धावांची सर्वोत्तम खेळीही आहे.

या मैदानाला सचिनने भारताबाहेरील आपले सर्वांत आवडते मैदान म्हणून म्हटले.एससीजीद्वारे जाहीर करण्यात आलेल्या पत्रकातून सचिनने म्हटले की, ‘भारताबाहेर सिडनी क्रिकेट ग्राउंड माझे आवडते मैदान ठरले आहे. १९९१-९२च्या माझ्या पहिल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून एससीजीसोबत माझ्या विशेष आठवणी आहेत.’ याच मैदानात वेस्ट इंडीजचा दिग्गज फलंदाज ब्रायन लाराने २७७ धावांची खेळी केली होती.

या खेळीला ३० वर्षे झाल्याच्या निमित्तानेही एससीजीमध्ये एका प्रवेशद्वाराला लाराचे नाव देण्यात आले. या दोन्ही गेटचे अनावरण एससीजीचे अध्यक्ष रॉड मॅकगियोच, केरी माथेर, निक हॉक्ले यांच्या उपस्थितीत करण्यात आले. काल सचिन तेंडुलकरने आपला ५० वा वाढदिवस साजरा केला यासाठी खास कोकणात त्याने यंदा आपला वेकेशन एंजॉय करत आपल्या परिवाराबरोबर आनंद साजरा केला.

Team Global News Marathi: