आघाडी सरकार कोसळल्यानंतर पुण्यात दोन महत्वाच्या पोट निवडणूका होणार असल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापायला सुरुवात झाली होती. कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचे गेल्यावर्षी 22 डिसेंबरला निधन झाले होते. तर चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे यावर्षी 3 जानेवारीला प्रदीर्घ आजाराने निधन झाले होते.विद्यमान आमदारांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कसबा व चिंचवड विधानसभा मतदारसंघात केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे पोट निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या.
26 फेब्रुवारी रोजी या निवडणुका पडणार आहेत. तर, दुसरीकडे कसबा आणि चिंचवड विधानसभेत भाजप कडून नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागले असतानाच पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी पाच नावे प्रदेशस्तरावर कळविण्यात आली असल्याचं सांगितलं आहे. प्रदेश स्तरावरील बैठकीनंतर तीन नावे अंतिम करून दिल्लीला पाठवली जातील. त्यानंतर एक किंवा दोन तारखेपर्यंत उमेदवार जाहीर होईल,’ असं देखील चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, चंद्रकांत पाटील त्यांच्या या विधानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट दिल्लीतून पुण्यात येणार आहेत. एका प्रसिद्ध वर्तुत्तसंस्थेने याबद्दल माहिती दिली आहे. पुण्यातील एका कार्यक्रमासाठी देवेंद्र फडवीस पुण्यात येणार आहे. त्यावेळी ते भाजपच्या नेत्यांनादेखील भेटणार आहे. त्यामुळे आज नेमका उमेदवार निश्चित होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून मुक्ता टिळक यांचे पती ‘शैलेश, मुलगा कुणाल यांच्याशिवाय हेमंत रासने, धीरज घाटे आणि गणेश बीडकर’ ही नावे सध्या चांगलीच चर्चेत आहेत.