Saturday, March 25, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result

कसबा पोटनिवडणुकीतून टिळक कुटुंबियांना डावलून या नावाची जोरदार चर्चा

by Team Global News Marathi
February 3, 2023
in राजकारण
0
कसबा पोटनिवडणुकीतून टिळक कुटुंबियांना डावलून या नावाची जोरदार चर्चा

 

कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीतून टिळक कुटुंबाला तिकीट मिळण्याची शक्यता मावळली असून शर्यतीतून बाहेर पडल्याची चर्चा आहे. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक यांना प्रदेश प्रवक्ते नियुक्त केले. या जागेसाठी मंगळवारपर्यंत अर्ज करायचे आहेत. दरम्यान, विद्यमान आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाल्यानंतर या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे.

सुरुवातीला मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांना उमेदवारी देऊन निवडणूक बिनविरोध करण्याबाबत चर्चा होती. पण शहर भाजपने प्रदेश भाजपकडे पाच नावं पाठवली आहेत. त्यात टिळक पितापुत्रांसह स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने, माजी सभागृहनेते धीरज घाटे, गणेश बीडकर यांचा समावेश असल्याची चर्चा आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत उमेदवाराची घोषणा अपेक्षित असतानाच भाजपने कुणाल टिळक यांची प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती करण्याची खेळी खेळली.

टिळक कुटुंबीयांची कसब्याच्या उमेदवारीवरील दावेदारी संपुष्टात आल्याची चर्चा आहे. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधरच्या पाच मतदारसंघांतील निवडणुकीत सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रभाव असलेल्या नागपूरमध्ये शिक्षक मतदारसंघाची हक्काची जागा भाजपने गमावली. निवडणुकीत महाविकास आघाडीने वर्चस्व राखल्याचं चित्र आहे.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post
व्हॉट्सअॅप स्टोरेज फुल झालं ? एका मिनिटात स्पेस कशी रिकामी करायचा

व्हॉट्सअॅप स्टोरेज फुल झालं ? एका मिनिटात स्पेस कशी रिकामी करायचा

Recent Posts

  • राशिभविष्य ; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • एकनाथ शिंदेचा राऊतांना दणका;संसदीय नेतेपदावरून संजय राऊतांना हटवले; कीर्तिकरांची नियुक्ती!
  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • भाग्यकांता सामाजिक सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्षपदी सुनिता गाडेकर तर सचिवपदी गणेश शिंदे
  • ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा बार्शीत गुन्हा दाखल

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group