कर्नाटक सरकारची हुकूमशाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेला दर्शवला विरोध….!

कर्नाटक सरकारची हुकूमशाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेला दर्शवला विरोध….!

काही दिवसापूर्वी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी खासदारकीची शपथ घेताना “जय भवानी जय शिवाजी” घोषणा दिल्यानंतर राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी छत्रपतींच्या घोषणेला सभागृहात विरोध दर्शवला होता. आता पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महारांविरोधात भाजपामध्ये असलेला द्वेष त्यांचीच सत्ता असलेल्या कर्नाटक राज्यात दिसून आला आहे.

कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी मणगुत्ती गावात २ दिवसांपूर्वी अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली होती, मात्र तेथील काही तथाकथित प्रादेशिक संघटनांनी या प्रतिष्ठापणेला तीव्र विरोध दर्शवला होता विशेष करून त्यांच्या या विरोधाला कर्नाटक सरकारचे पाठबळ असल्याचे बोलले जात होते. तसेच छत्रपती शिवरायांची मूर्ती चौथऱ्यावरून कर्नाटक सरकारच्या आदेशावरून पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आली होती.

या घटनेवरून पुन्हा एकदा भाजपाचे छत्रपती शिवाजी महारांविरोधात असलेली खोटी निष्ठा समोर आलेली आहे. याबाबत कर्नाटकात सत्ता असलेल्या भाजपाने सुद्धा या विरोधात ब्र सुद्धा शब्द काढलेला नाही. त्यामुळे बेळगावमधील मराठी बहुत भागामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोषाचे आणि तणावाचे वातावरण पसरले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: