कारागृहात पती-पत्नीला एकांतात भेटण्याची सोय, शारीरिक संबंधही ठेवता येणार

 

कैद्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. तुरुंगातल्या कैद्याला आपल्या जोडीदारासोबत एकांतात एकत्र वेळ घालवता येणार आहे. या सुविधेची सर्वत्र चर्चा होत आहे. तुरुंगात कैद्यांसाठी खास खोली बनवण्यात आली आहे. या खोलीत भेटीदरम्यान कैदी शारीरिक संबंधही बनवू शकतो.

आजच्या घडीला हे ऐकायला थोडं आश्चर्यकारक वाटत असले तरी हे खरं आहे. पंजाबमधील तुरुंगात बंद कैद्यांना आता अशी सुविधा मिळणार आहे. आता पती-पत्नी पंजाबच्या तुरुंगात एकांतात वेळ घालवू शकणार आहेत. अशी सुविधा देणारे पंजाब हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.एक अप्रसिद्ध माद्यमाने दिलेल्या वृत्तानुसार सिंग गोइंदवाल तुरुंगातील कैदी गुरजित हे या सुविधेचा लाभ घेणारे पहिले कैदी आहेत.

सिंग यांनी सांगितले की, तुरुंगातील कैद्याला एकटेपणा जाणवतो त्यामुळे ते नैराश्यात राहतात, मात्र या सुविधे अंतर्गत जेव्हा माझी पत्नी मला भेटायला आली तेव्हा आम्ही एका खोलीत काही तास एकांतात घालवले. माझ्यासाठी हा मोठा दिलासा होता, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
गुरजीत सिंग हे हत्येप्रकरणी शिक्षा भोगत आहे.

तसेच या नव्या सुविधेबद्दल ते पंजाब सरकारचे आभार मानत आहेत. पती-पत्नीला जेलमध्ये एकांतात भेटण्याची सुविधा देणारे पंजाब आता पहिले राज्य बनले आहे. पंजाबच्या या तुरुंगात मिळणाऱ्या सुविधांबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे या भेटीदरम्यान पती-पत्नीमध्ये शारीरिक संबंधही ठेऊ शकतात.

यापूर्वी पंजाबमध्ये कैद्यांना त्यांना भेटायला आलेय जोडीदाराशी शारीरिक संबंध ठेवण्याची परवानगी नव्हती. भेटायला आलेले कुणीही ठराविक अंतरावर उभे राहून बोलू शकत होते. यादरम्यान त्यांच्यामध्ये काचेची भिंतही होती. गुरजीत सिंह म्हणाले की, आता सरकार विवाहित जोडप्यांना तुरुंगात खाजगी भेटीगाठी घेण्याची परवानगी देत ​​आहेत

Team Global News Marathi: