कामगार संघटनांचा देशव्यापी संप, आज आणि उद्या बँका बंद राहणार

 

नवी दिल्ली | केंद्र सरकारच्या कामगारविरोधी, शेतकरीविरोधी, जनताविरोधी धोरणांविरोधात कामगार संघटनांनी देशव्यापी संप पुकारला आहे. 28 व 29 मार्च रोजी दोन दिवस चालणाऱया या संपामध्ये घरकामगार, विडी कामगारांपासून ते सरकारी कर्मचाऱयांबरोबरच बँक कर्मचारीही सहभागी होणार आहेत. यामुळे आधीच शनिवार आणि रविवार बंद असलेल्या बँका सोमवारी आणि मंगळवारीही बंद राहणार असून याचा थेट परिणाम सर्वच आर्थिक व्यवहारांवर होणार आहे.

केंद्र सरकारने केलेले चार कामगार कायदे, सरकारी उद्योगांच्या खासगीकरणामुळे देशातील महागाई, बेरोजगारी वाढेल. त्याचप्रमाणे कामगार हक्कांची पायमल्ली होईल, असा दावा या कामगार संघटनांनी केला आहे. नियोजन कामगार, घर कामगार, फेरीवाले, विडी कामगार, बांधकाम कामगार, कोळसा, पोलाद, तेल, दूरसंचार, टपाल, आयकर, बँका, विमा या क्षेत्रांतील कामगार संघटनाही या संपात सहभागी झाल्या आहेत.

तसेच ईपीएफचा व्याजदर 8.5 टक्क्यांवरून 8.1 टक्क्यांवर करण्यात आला असून पेट्रोल, एलपीजी, केरोसीन, सीएनजीच्या दरातही अचानक वाढ करण्यात आली आहे, या सर्वांचा निषेध करताना कामगार संघटनांनी ‘सेव्ह पिपल, सेव्ह नेशन’ या घोषणेखाली संपाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.

Team Global News Marathi: