मुंबई | विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाचे शिल्पकार ठरले. यानंतर फडणवीसांचं कौतुक करताना भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी त्यांचे तोंडभरून कौतुक केले तर आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली.
फडणवीस सर्वांना पुरून उरतील. असे अनेक ठाकरे आणि पवार ते खिशात घेऊन फिरतात, अशी टीका नितेश राणेंनी केली होती. राणेंच्या या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पवारांची पाठराखण करताना राऊतांनी नितेश राणेंना देखील अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. त्यामुले येणाऱ्या दिवसात राणे कुटुंबीय आणि शिवसेना यांच्यातील वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कालची आलेली पोरं शरद पवारांना टार्गेट करतायत, असा अप्रत्यक्ष टोला राऊतांनी नितेश राणेंना लगावला आहे. तर ज्या भाषेत ते पवारांबद्दल बोलतात हे फडणवीसांना मान्य आहे का? हे मोदींना मान्य आहे का? हे नितीन गडकरींना मान्य आहे का? असा सवाल देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.