नोकरी या जन्मात, प्रेम पुढच्या जन्मात…; सनदी अधिकाऱ्याचे ट्विट व्हायरल
स्पर्धा परीक्षांसाठी अनेकजण तयारी करतात. अनेकजण दोनतीन वर्षे चांगला अभ्यास करत, परीक्षा आणि मुलाखतींची तयारी करत असतात. या मेहनतीमुळे युपीएसईची परीक्षेत यशस्वी झाल्यावर सनदी अधिकारी होता येते. मात्र, सनदी अधिकारी झाल्यावरच खऱ्या आव्हांनाना सुरुवात होते. सनदी अधिकाऱ्याचे जीवन कसे असते, याबाबत वॅलेंटाइन-डेच्या निमित्ताने एका सनदी अधिकाऱ्याने केलेले मजेदार ट्विट व्हायरल होत आहे.
वॅलेंटाइन-डे निमित्ताने सोशल मिडीयावर अनेक मेसेज फॉरवर्ड होत आहेत. या सर्व मेसेजमध्ये एका आयएएस अधिकाऱ्याचे मॅसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या मेसेजला अनेकांनी रिट्विट करत सनदी अधिकाऱ्यांच्या कार्यतत्परतेचे कौतुक केले आहे. वॅलेंटाइन-डे निमित्ताने सनदी अधिकारी अवनीश शरण (Awanish Sharan) यांनी मजेदार पद्धतीने आपल्या भआवना व्यक्त केल्या आहेत. सनदी अधिकारी होण्यासाठी तत्पर असलेले आणि सनदी अधिकारी झालेले वॅलेंटाइन-डेबाबत काय विचार करतात, हे त्यांनी एका वाक्यात मांडले आहे.
‘वैलेंटाइन डे’ पर UPSC ऐस्पिरेंट की भावना. pic.twitter.com/ZcblYKlUgJ
— Awanish Sharan (@AwanishSharan) February 11, 2022
अवनीश शरण यांनी आपल्या ट्विटमध्ये ‘विश्वनाथ प्रसाद तिवारी’ यांचा एक कोट शेअर केला आहे. ‘नोकरी या जन्मासाठी आणि जगण्यासाठी गरजेची आहे. त्यामुळे प्रेम पुढच्या जन्मापर्यंत स्थागित करतो. नोकरी या जन्मात, प्रेम पुढच्या जन्मात’ असे अवनीश यांनी ट्विट करत वॅलेंटाइन डे निमित्त UPSC ऐस्पिरेंटची भावना, अशी कॅप्शन दिली आहे.
वॅलेंटाइन-डे वीकदरम्यान प्रॉमिस-डेनिमित्तही अवनीश यांनी मजेदार ट्विट केले होते. सगळ्यात जास्त तोडण्यात येणारे प्रॉमिस, अशी कॅप्शन देत त्यांनी आई आणि मुलाचा एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोत आई हातात चप्पल घेत पलंगाखाली लपलेल्या मुलाला बाहेर येण्यास सांगते, तसेच बाहेर आल्यावर मारणार नाही, असे प्रॉमिस करताना दिसत आहे.
सबसे ज़्यादा तोड़ा जाने वाला ‘प्रॉमिस.’ 😢#promiseday pic.twitter.com/5FDgEBGy08
— Awanish Sharan 🇮🇳 (@AwanishSharan) February 11, 2022
अवनीश यांच्या ट्विटवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. नोकरी लागल्यानंतरही प्रेम होऊ शकते, असे एका युजर्सने म्हटले आहे. प्रेम थेट पुढच्या जन्मात, म्हणजे पुढच्या जन्मात युपीएससी करायचे नाही काय, असा मजेशीर प्रतिप्रश्न एका युजरने केला आहे. सोशल मिडीयावर सनदी अधिकाऱ्याचे हे मजेशीर ट्विट व्हायरल होत आहे.