Tuesday, January 31, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result

जयंत पाटलांना जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा विसर, मात्र दलबदलू नेत्यांना मान

by Team Global News Marathi
November 4, 2022
in महाराष्ट्र
0
जयंत पाटलांना जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा विसर, मात्र दलबदलू नेत्यांना मान

 

इस्लामपूर | राजारामबापू पाटील यांच्या निधनानंतर जयंत पाटील यांना पाठबळ देण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा होता, अशा ज्येष्ठ निष्ठावंत कार्यकर्त्यांचा पाटील यांना विसर पडत चालला आहे.राजकारणातील बदलत्या समीकरणांतून दलबदलू कार्यकर्त्यांचा भाव वधारत चालला आहे, अशी खंत राष्ट्रवादीतील जुने कार्यकर्ते, माजी नगरसेवक शंकरराव पाटील यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.

राजारामबापू यांच्या निधनानंतर विधानसभेचा इस्लामपूर मतदारसंघ आणि बापूंनी उभ्या केलेल्या सहकारी संस्था पोरक्या झाल्या. बहुतांशी कार्यकर्त्यांतून बापूंचे राजकीय वारसदार म्हणून त्यांचे पुत्र जयंत पाटील यांचे नाव पुढे आले. काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. परंतु उरुण परिसरातील बहुतांशी बापूप्रेमी कार्यकर्त्यांनी जयंतरावांना साथ देण्याचा निर्णय घेतला. त्यापैकी मी एक कार्यकर्ता होतो. परंतु जयंतरावांचा वाढता राजकीय आलेख पाहून इतर पक्षातील कार्यकर्त्यांची घुसखोरी झाली, याची खंत शंकरराव पाटील यांनी व्यक्त केली.

पाटील म्हणाले, राजारामबापू पाटील यांनी राज्याच्या सत्तेत असताना सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय दिला. परंतु अलीकडील काळात आपला कोण, परका कोण, याचे आत्मपरीक्षणच केले जात नाही. ज्याच्याकडे सत्ता त्याच्याकडे कार्यकर्त्यांचा ओघ, असे नवीन सूत्र राजकारणात आले आहे.

त्यातच अलीकडील काळात पै-पाहुण्यांचे राजकारण फोफावले आहे. त्यामुळे सर्वसामान्य आणि निष्ठावान कार्यकर्ते जयंतरावांपासून दूर गेल्याचे दिसत असल्याचाही दावा काही निष्ठावान कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यापैकी मी एक असून, आता राष्ट्रवादीचा सामान्य कार्यकर्ता म्हणून आजही जयंतरावांशी एकनिष्ठ आहे.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post
बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या पद्धतीनं बंडखोरांना धडा शिकवणार – आदित्य ठाकरे

सभेला परवानगी नाकारली; आदित्य ठाकरेंनी केवळ तीन शब्दांत शिंदेंना सुनावले

Recent Posts

  • उद्धव ठाकरे हेच खरे गद्दार ; रामदास कदमांनी पुन्हा साधला निशाणा
  • खासगी टीव्ही चॅनल्सना ‘देशहित’शी संबंधित मजकूर दाखवावा लागणार, केंद्र सरकारचा निर्णय
  • पाणीप्रश्न जिव्हाळ्याचा, या मुद्द्यावर मुख्यमंत्री के.सी. राव यांच्याशी चर्चा करणार
  • ‘पठाण’ची यशस्वी वाटचाल’, कार्तिकच्या सिनेमाची रिलीज डेटमध्य बदल
  • सोन्या-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचे दर

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group