जनतेची मुस्कटदाबी करून देशातील समस्या सुटणार नाहीत, सोनिया गांधी यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवे जोरदार हल्ला चढवला पंतप्रधान नरेंद्र मोदी महत्त्वाच्या मुद्दय़ावर गप्प आहेत. त्यांच्या सरकारच्या कामामुळे कोटय़वधी लोकांच्या जीवनावर परिणाम होताना दिसत आहे. या विरोधात आवाज उठविणाऱ्यांना गप्प करण्यासाठी अनेक उपायांचा अवलंब केला जात आहे. भंपक गोष्टी करून चर्चेचा मुद्दा भरकटवणे, संसदेत बोलू न देणे, खासदारकी तडकाफडकी रद्द करणे असे प्रकार देशात सुरू आहेत. अशा प्रकारे जनतेची मुस्कटदाबी करून देशातील समस्या सुटणार नाहीत, अशा शब्दांत कॉँग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

कॉँग्रेसकडून अदानी प्रकरण आणि राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यावरून केंद्र सरकारवर संसदेबाहेरही हल्लाबोल सुरू आहे. त्यात आता कॉँग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांनीही एक सविस्तर लेख लिहीत संसदेत विरोधकांना बेरोजगारी, महागाई, सामाजिक विभाजन, अदानी यांसारखे मुद्दे उपस्थित करण्यापासून रोखण्यावरून मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. हिंदुस्थाच्या लोकशाहीचे तीनही स्तंभ पद्धतशीरपणे मोडीत काढण्याचा प्रयत्न मोदी सरकारकडून सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

संसदेत सरकारपुढे मजबूत विरोधक होते. ते आपल्या प्रश्नांवर ठाम होते. यामुळेच नरेंद्र मोदी सरकारने विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी दडपशाही करत यापूर्वी कधीच उचलण्यात आली नव्हती, अशी पावले उचलली. सरकारने विरोधी बाकावरील खासदारांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे वगळले. त्यांना बोलण्यापासून रोखले. संसद सदस्यांवर टीका केली आणि अखेरीस वेगवान पावले उचलत काँग्रेसच्या एका खासदाराचे सदस्यत्व रद्दबातल केले, असे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.

 

Team Global News Marathi: