उद्योगपती बजाज मोटर्सचे संस्थापक पद्मभूषण राहुल बजाज यांचे निधन
बजाज मोटर्सचे संस्थापक राहुल बजाज यांचे शनिवारी निधन झाले आहे. ते 83 वर्षांचे होते. ते 50 वर्षे बजाज सुमहाचे चेअरमन होते. त्यांना 2001 मध्ये प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पद्मभूषण पुरस्काराने गैरवण्यात आले होते. स्वातंत्र्यसेनानी आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जमनालाल बजाज यांचे ते नातू होते. त्यांच्या निधनाने उद्योगविश्वात पोकळी निर्माण झाली आहे.
राहुल बजाज यांनी वाढत्या वयाचा दाखला देत गेल्या वर्षी पदाचा राजीनामा दिला होता. ते बजाज ऑटोचे 1972 पासून आणि बजाज समुहाचे सुमहाशी पाच दशाकांपासून जोडले गेले होते. त्यांच्या कार्यकाळात कंपनीने मोठी घोडदौड केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते कर्करोगाचा सामना करत होते.
राहुल बजाज यांनी दिल्लीतील सेंट स्टीफन्स कॉलेजमधून पदवी घेतली. तसेच मुंबईतील विधी विद्यापीठातून कायद्याची पदवीही त्यांनी घेतली होती. राहुल बजाज यांनी 1965 मध्ये बजाज समुहाची जबाबदारी सांभाळली. त्यावेळी देशात मुक्त अर्थव्यवस्था नव्हती. त्यांनी कंपनीची जबाबदारी सांभाळल्यानंतर बजाज चेतक नावाची स्कूटर बनवली. ती अल्पावधीतीच लोकप्रिय झाली. तसेच ही स्कूटर देशीतील मध्यमवर्गीयांचे प्रतीक बनली. यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीची घोडदौड सुरूच राहीली.
देशात 90 च्या दशकात उदारीकरणाची सुरुवात झाली आणि देशात मुक्त अर्थव्यवस्थेला सुरू झाली. त्यानंतर जपानी मोटर सायकल कंपन्यांकडून हिंदुस्थानी दुचाकींसमोर आव्हान उभे केले. या आव्हानात्मक परिस्थितीतही राहुल बजाज यांनी कंपनीला आणखी पुढे नेले. बजाज ऑटो कंपनीची उलाढाल एकेकाळी 7.2 कोटी होती. ती आता 12 हजार कोटींपर्यंत पोहचली आहे. तसेच कंपनीच्या उत्पानातही वाढ झाली आहे. राहुल बजाज यांच्या नेतृत्वाखाली कंपनीला जागतिक बाजारपेठेत महत्त्वाचे स्थान मिळाले.
राहुल बजाज हे देखील लहानपणापासून त्यांच्या वृत्तीसाठी ओळखले जात होते. लहानपणी एके काळी, जेव्हा शिक्षकाने त्याला वर्गाबाहेर फेकले तेव्हा राहुल बजाज म्हणाला – तुम्ही बजाजला मारू शकत नाही. राहुल बजाज कधीच कोणाच्या हाताखाली काम करणारे नव्हते. एकदा त्यांनी विद्यमान गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोरही सरकारवर जोरदार टीका केली होती. राहुल बजाज म्हणाले होते की, देशात लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सरकार त्यांची टीका कशी घेईल यावर लोकांचा विश्वास बसत नाही.