दुर्दैवी घटना: भारताचे पहिले सीडीएस बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू

दुर्दैवी घटना: भारताचे पहिले सीडीएस बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू

 

नवी दिल्ली : भारताचे पहिले सीडीएस जनरल (CDS General) बिपीन रावत (Bipin Rawat) यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत (Helicopter crash) मृत्यू झाला आहे. तामिळनाडूमध्ये  हवाई दलाचे Mi-17V5 हेलिकॉप्टर क्रॅश (Army chopper crashe) झाले, त्यात त्याचा मृत्यू झाला असून त्यांच्याबरोबर प्रवास करणारे इतर 13 जणांचा देखील मृ्त्यू या अपघातात झाला आहे.

या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत ह्यादेखील  या हेलिकॉप्टरमध्ये होत्या. त्यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, रावत हे एका कार्यक्रमाला हजेरी लावून दिल्लीला परत येत होते. त्यांच्यासोबत या हेलिकॉप्टरमध्ये 14 जण प्रवास करत होते. दिल्ली परत येत असताना तमिळनाडू कोईम्बतूर (Coimbatore) आणि सुलूरदरम्यान कुन्नूर येथील  जंगलाच्या परिसरात हेलिकॉप्टरचा अपघात झाला आणि बिपीन रावत यांचा त्यात मृत्यू झाला. या दुर्घटनेत सर्व 14 जणांचा मृत्यू झाला आहे. रावतांच्या निधनानंतर राष्ट्रपतींनी राजभवनावरील नव्या दरबार हॉल उद्घाटनाचा नियोजित कार्यक्रम रद्द केला. राज्यपालांनी शेवटच्या क्षणी घोषणा करून कार्यक्रम रद्द केला.

बालपण आणि शिक्षण

सीडीएस बिपिन रावत हे उत्तराखंड येथील होते. उत्तराखंडातील सैन या गावाचे रहिवाशी होते. जनरल बिपिन रावत यांचा जन्म 16 मार्च 1958 रोजी डेहराडून येथे झाला. वडील लष्कारमध्ये असल्याने बिपिन रावत यांचं बालपण लष्करी शिस्तीमध्येच गेलं. त्यांचं प्राथमिक शिक्षण शिमल्यामधील सेंट एडवर्ड स्कूलमध्ये झालं. त्यानंतर बिपीन रावत यांनी इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये प्रवेश घेतला आणि ते पुन्हा आपल्या जन्मस्थळी म्हणजेच डेहराडूनला गेले.त्यांना स्वॉर्ड ऑफ ऑनर ही पदवी देण्यात आली.

ते डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, वेलिंग्टन आणि फोर्ट लीव्हनवर्थ, यूएसए येथील हायर कमांड कोर्सचे पदवीधर आहेत. त्यांनी मद्रास विद्यापीठातून डिफेन्स स्टडीज, डिप्लोमा इन मॅनेजमेंट आणि डिप्लोमा इन कॉम्प्युटर स्टडीज देखील केले होते. 2011 मध्ये त्यांनी स्ट्रॅटेजिक स्टडीजवर लष्करी-माध्यम संशोधन चौधरी चरण सिंग विद्यापीठ, मेरठ यांनी संशोधनासाठी डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी प्रदान करण्यात आली होती.

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून निवड

15 ऑगस्ट 2019 रोजी भारताच्या 73 व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संरक्षण दलांना बळकटी देण्यासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पद तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर 31 डिसेंबर 2019 रोजी भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून जनरल बिपिन रावत यांची निवड करण्यात आली. लष्करप्रमुखपदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांना सीडीएस करण्यात आले. ते तिन्ही सैन्यातील सर्वोच्च लष्करी अधिकारी होते. ते भारताचे पहिले CDS देखील होते. संपूर्ण उत्तराखंड बिपीन रावत यांच्याकडे अभिमानाने पाहत असे. त्यांची सीडीएस म्हणून नियुक्ती झाली तेव्हाही त्यांच्या गावातील नागरिकांनी जल्लोष केला होता. जनरल बिपिन रावत यांना देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) बनवल्यानंतर त्यांच्या मूळ गावी सैन येथील लोकांनी आनंद व्यक्त केला होता.

पहिलं सन्मानपत्र

या अकादमीमधील त्यांची चमकदार कामिही पाहून त्यांना स्वार्ड ऑफ ऑनर हे पहिलं सन्मानपत्र मिळालं. त्यानंतर बिपिन रावत यांनी अमेरिकेत शिक्षण घेण्याचं ठरवलं आणि ते अमेरिकेला गेले, तेथे त्यांनी सर्व्हिस स्टाफ कॉलेजमध्ये पदवी प्राप्त केली.

भारतात परतल्यानंतर लष्करी सेवेत

अमेरिकेतून भारतात परतल्यानंतर बिपिन रावत यांनी सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला. १६ डिसेंबर १९७८ रोजी बिपिन यांचं लष्करात भरती होण्याचं स्वप्न पूर्ण झालं.

करिअर

1978 मध्ये 11 व्या गोरखा रायफलच्या पाचव्या बटालियनमधून बिपीन रावत यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली होती. 1986 मध्ये चीनला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर त्यांनी पायदळाची धुरा संभाळली होती. गेल्या 30 वर्षांत भारतीय लष्करातील विविध महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केले होते.
सुत्रांच्या माहितीनुसार, भारताच्या वतीनं रावत यांनी अनेक मोठ्या लष्करी मोहिमांचे नेतृत्व केलं आहे. पाकिस्तानला लागून असलेली नियंत्रण रेषा, भारत-चीन सीमा व ईशान्येकडील राज्यांत त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.अत्यंत समतोल पद्धतीनं सैन्याचं संचालन करणं, सुरक्षाविषयक मोहिमा आखून त्या यशस्वीरित्या पार पाडणं व नागरिकांशी सहज संवाद साधण्यात त्यांचा हातखंडा होता.

अनेक पदकं…

आपल्या लष्करी सेवेदरम्यान बिपिन रावत यांना अनेक पुरस्कारही मिळालेत. लष्करात अनेक पदकं त्यांनी मिळवली आहेत. त्यांच्या सेवेत जनरल रावत यांना परम विशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक आणि सेना पदकांनी सन्मानित करण्यात आलं आहे.

बिपीन रावत पहिले सीडीएस

तिन्ही संरक्षण दलांमध्ये समन्वय साधण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या संरक्षण प्रमुखपदी (चीफ ऑफ डिफेन्स) जनरल बिपिन रावत यांची 30 डिसेंबर 2019 रोजी निवड करण्यात आली. त्यांच्या जागी लष्करप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी 31 डिसेंबर 2019 रोजी सूत्रे स्वीकारली होती. जनरल रावत हे 31 डिसेंबर 2019 रोजी लष्करप्रमुखपदावरून निवृत्त झाले आणि त्याच दिवशी त्यांची भारतातील पहिली CDS म्हणून नियुक्ती झाली.
संरक्षणप्रमुखपदावरून सेवानिवृत्तीसाठी 65 वष्रे ही वयोमर्यादा असून रावत हे सध्या 63 वर्षांचे आहेत. संरक्षणप्रमुख हे संरक्षणमंत्र्यांचे मुख्य लष्करी सल्लागार असतात. 2019 साली डिसेंबरच्या शेवटून दुसऱ्या आठवड्यात संरक्षणप्रमुख पदनिर्मितीला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती. त्याच वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात या पदनिर्मितीची घोषणा केली होती.

रावत यांच्याविषयीच्या काही ठळक गोष्टी

1978 ‘बेस्ट कॅडेट’ ते 2016 साली लष्करप्रमुख

2016 साली बिपीन रावत हे लष्करप्रमुख झाले. लष्करप्रमुख दलबीरसिंह सुहाग 31 डिसेंबर 2016ला सेवानिवृत्त झाले होते, त्यांच्या जागी रावत यांची नेमणूक करण्यात आली होती.

बिपीन रावत हे मूळचे उत्तराखंडचे आहेत. त्यांची 1 सप्टेंबर 2016 रोजीच सेनेच्या उपप्रमुखपदी नियुक्ती झाली होती.

बिपीन रावत यांचे वडिलही नि. लेफ्टनंट जनरल एल एस रावत हे सेनेच्या उपप्रमुखपदावर निवृत्त झाले होते.

रावत हे डिसेंबर 1978 मध्ये भारतीय सैन्य अकादमीतून पासआऊट झालेले ‘बेस्ट कॅडेट’ ठरले.

रावत यांना ‘स्वार्ड ऑफ ऑनर’ या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं.

इतकंच नाही सेवा मेडल, युद्ध सेवा मेडल, सेना मेडल आणि विशिष्ट सेवा मेडल सारख्या अनेक पुरस्कारांनी रावत यांना गौरवण्यात आलं आहे.

शत्रूंशी थेट भिडणारे अधिकारी म्हणून ओळख –

रावत हे शत्रूंशी थेट भिडणारे अधिकारी म्हणून ओळखले जातात. काश्मीरमधील फुटीरतावाद्यांना त्यांनी थेट आव्हान दिलं होतं. तसेच घुसखोरी केल्यास जमिनीत गाडू, अशा शब्दात त्यांनी पाकिस्तानला इशारा दिला होता. सोबतच मी माझ्या सैनिकांना लढायला सांगू शकतो, मरायला नाही असं देखील रावत यांनी म्हटलं होतं.
 

ग्लोबल न्युज नेटवर्क: