गाझियाबाद महानगरपालिकेने बीएसई बाँड प्लॅटफॉर्मचा उपयोग करून खासगी प्लेसमेंटच्या आधारे म्युनिन्सिपल बाँड्सच्या माध्यमातून रु.१५० कोटी (बेस इश्यु : १५० कोटी, रु.५० कोटीच्या ग्रीन शू पर्यायासह) इतका निधी उभा केला आणि तो आज एक्स्चेंजमध्ये सूचिबद्ध झाला आणि त्याचे सबस्क्रिप्शन ३१ मार्च २०२१ रोजी खुले झाले होते. या करपात्र बाँडचा कूपन दर वार्षिक ८.१% इतका निश्चित करण्यात आला आणि इंडिया रेटिंग्जकडून त्याला एए मानांकन मिळाले आणि ब्रिकवर्क्सकडून एए (सीई) मानांकन मिळाले आणि त्याचा असंमुख (स्टॅगर्ड) रिडक्शनसह १० वर्षांचा परिपक्वता कालावधी आहे.
या व्यतिरिक्त, म्युनिसिपल बाँड्स उभारण्यासाठी भारत सरकारकडून या महानगरपालिकेला रु.१९.५ कोटींचा इन्सेन्टिव्ह प्राप्त झाला आहे. पाणीपुरवठ्याशी संबंधित ध्येये आणि उद्दिषटांची पूर्तता करण्यासाठी महानगरपालिकेने साहिबाबाद इंडस्ट्रीज असोसिएशनशी करार केला आहे आणि या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या निधाचा अंशतः वापर तृतीयक सांडपाणी आणि पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठीचे प्रस्तावित आहे. याचा खर्च अंदाचे २३९.९३ कोटी रुपये इतका असेल.
या प्रसंगी प्रतिक्रिया देताना गाझियाबाद महानगरपालिकेचे महापालिका आयुक्त एमएस तावर म्हणाले, “हा अत्यंत महत्त्वाचा प्रसंग आहे आणि भांडवल उभारणीमुळे आर्थिक शिस्त लागेलच, त्यचाप्रमाणे पालिकेला भविष्यात अधिक जास्त निधी उभारण्यासाठीची संधीही प्राप्त होईल. बिड तारखेच्या दिवशी काही मिनिटांतच रु.४०१ कोटीच्या एकूण सबस्क्रिप्शनसाठी बिड प्राप्त झाल्या आणि तेही ८.१०% इतका स्पर्धात्मक कूपन दर असताना या बिड प्राप्त झाल्या. हा भारतातील महापालिकेने जारी केलेला पहिलाच ग्रीन बाँड आहे. म्युनिसिपल बाँड्सवर मार्केटचा असलेला विश्वास आणि उत्तर प्रदेशमधील उत्तम प्रशासनाचे हे प्रतिबिंब आहे.”
बाँड्स सूचिबद्ध करण्याच्या प्रसंगी बॉम्बे स्टॉकचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ आशीषकुमार चौहान म्हणाले, “बीएसई बाँड प्लॅटफॉर्मवर म्युनिसिपल बाँड्स इश्यु करून रु.१५० कोटी उभारल्याबद्दल मी गाझियाबाद नगर निगमचे अभिनंदन करतो. काही मिनिटातच ऑर्डर बुक चौपटीपेक्षा जास्त ऑर्डर्सनी भरले. भारतीय बाँड मार्केटमध्ये गाझियाबाद नगर निगम ही विश्वासार्ह राज्यक (एंटिटी) आहे हे दिसून आले. प्रगती करण्यासाठी आणि नागरी केंद्रांमध्ये आधुनिक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मार्केटवर आधारीत कर्जाऊ रक्कम उभी करण्यासाठी श्री. योगी आदित्यनाथ यांच्या दूरदृष्टी व पारदर्शक धोरणे असलेल्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या संपूर्ण उत्तरप्रदेश प्रशासनाचेही मी अभिनंदन करतो. ग्रीन बाँड मार्केटमध्ये प्रचंड क्षमता आहे आणि भारतीय महानगरपालिकांना पर्यावरणपूरक आणि वातावरणाशी जुळवून घेणाऱ्या नागरी सुविधांच्या लक्ष्याची पूर्तता करण्यासाठी ही एक आकर्षक संधी आहे. बीएसई बाँड प्लॅटफॉर्ममुळे ऋण रोख्यांच्या (डेट सिक्युरिटीज) प्लेसमेंटसाठी पारदर्शकता आणि किंमत निर्धारीत करण्यासाठी मदत झाली आहे आणि हा प्लॅटफॉर्म अखंडितपणे सबस्क्रिप्शन घेण्यासाठी सक्षम करतो.
या इश्यूचे यश आणि भारतातील म्युनि बाँड संधींबद्दल ए. के. कॅपिटलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ए. के. मित्तल म्हणाले, “म्युनिसिपल बाँड क्षेत्रात ऐतिहासिक कमी दरात रु.१५० कोटींचे ग्रीन म्युनिसिपल बाँड्स उभे केल्याबद्दल गाझियाबाद महानगरपालिकेचे अभिनंदन. या इश्युसाठी मर्चंट बँकर्स म्हणून सलंग्न झाल्याचा एके कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेडला अभिमान आहे. गाझियाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशन बाँड्सना भक्कम संरचित पेमेंट यंत्रणेचे पाठबळ लाभले आहे. त्यामुळे हे बाँड्स एए ग्रुप रेटिंग इन्स्ट्रुमेंट झाले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी ही आकर्षक परतावा असलेली सुरक्षित गुंतवणूक झाली आहे. भारतीय म्युनिसिपल बाँड मार्केटमध्ये नावीन्यपूर्ण संरचना आणि विविध प्रकारच्या गुंतवणूकदाराचे (गुंतवणूकदारांचा) सहभागामध्ये वेगाने विकास होत असल्याचे आम्हाला दिसून येत आहे. लखनौ म्युनि आणि गाझियाबाद म्युनी बाँडच्या यशानंतर ग्रीन बाँड्सच्या माध्यमातून निधी उभारण्यासाठी अधिक नागरी स्थानिक संस्था ऋण बाजाराचा (डेट मार्केट) उपयोग करून घेतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे.