रशियाच्या Sputnic V लशीच्या इमर्जन्सी वापराला भारताने दिला नकार

नवी दिल्ली : भारताने गुरुवारी झालेल्या बैठकीत पुन्हा एकदा रशियन Sputnic V लसीला मान्यता दिलेली नाही. स्पुतनिक व्ही लसीच्या इमर्जन्सी वापराचा प्रस्ताव फेटाळून लावत या लसीबाबत आणखी माहिती देण्याची मागणी भारतीय औषध महानियंत्रक मंडळाच्या तज्ज्ञ समितीने डॉ. रेड्डीज लॅबकडे केली आहे.

हैदराबादमधील फार्मा कंपनी डॉ.रेड्डीज लॅबने रशियन डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंडासोबत स्पुतनिक व्ही लस भारतात तयार करण्यासाठी करार केला होता. मात्र डॉ.रेड्डीज लॅबकडे लसीसंदर्भात अधिक माहिती मागितली आहे.

रशियाच्या Sputnic V या लस Coronavirus विरोधात ९१.६ टक्के प्रभावी असल्याचा दावा रशियाने केला तशी नोंद ऑगस्टमध्ये करण्यात आली आहे. रशियाने सर्वात प्रथम या लसीला मंजुरी दिली होती. त्यानंतर सप्टेंबर महिन्यापासून Sputnic V लस नागरिकांना देण्यास सुरुवात झाली. या लसीचे दोन डोस घ्यावे लागतात.

पहिल्या डोस घेतल्यानंतर साधारण २१ दिवसांनी दूसरा डोस घ्यावा लागतो. त्यानंतर २८ ते ४२ व्या दिवसांनंतर शरीरात रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास सुरूवात होते. भारतात आतापर्यंत या लसीच्या १ हजार ५०० जणांवर चाचण्या झाल्या आहेत. भारतीय औषध महानियंत्रक मंडळाकडून मंजुरी मिळाल्यानंतर ही लस सामान्य नागरिकांना देण्यात येणार आहे.

Team Global News Marathi: