बिहार काँग्रेस मुख्यालयात आयकर विभागाची धाड

बिहार काँग्रेस मुख्यालयात आयकर विभागाची धाड

बिहार विधानसभा निवडणुक अधिक रंगतदार होत असताना बिहार काँग्रेस प्रदेश कार्यलयावर आयकर विभागाने छापा टाकला आहे. या छाप्यामध्ये एकूण ८ लाखाची रोकड आयकर विभागाच्या कर्मचारी वर्गाच्या हाती लागलेली आहे. सदर रक्कम प्रदेश कार्यलयाजवळ असलेल्या एक कारमधून मिळाल्यामुळे धाड टाकण्यात आलेली आहे. या प्रकरणी काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला आणि बिहारचे प्रभारी शक्ती सिंह गोयल यांचीही चौकशीही करण्यात आली आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचाराला जिरदार सुरवात झालेली असताना आयकर विभागाची धाड पडल्याने राजकीय वातावरण अधिक तापले आहे. काँग्रेस मुख्यालयावर आयकर विभागाने धाड टाकली आहे. तसेच आयकर अधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या कार्यालयावर याबाबत नोटीसही लावली आहे. हे पैसे कुणाचे आहेत याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

संपूर्ण स्त्री खूप कमी लोकांना मिळते..!! वाचा वास्तववादी लेख

शक्तीसिंह गोयल यांनी याप्रकरणी इन्कमटॅक्स विभागावर टीका केली आहे. ते म्हणाले आहेत की पैसे काँग्रेस मुख्यालयात नाही तर मुख्यालयाच्या परिसरात पार्क केलेल्या एका कारमध्ये सापडले आहेत. तरीही काँग्रेसला नोटीस बाजवण्यात आली आहे, असे असले तरीही आम्ही तपासात सहकार्य करु, असे काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: