उत्तर प्रदेशात लखीमपूर घटनेने भाजपा विरोधात नागरिकांमध्ये संतापाची लाट

 

लखीमपूर येथे रविवारी चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाल्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये भाजप विरोधात नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण अपसरले असून भाजपच्या येणाऱ्या विधसभा निवडणुकीला अडचणी वाढल्या आहेत. शेतकरी आंदोलनामुळे पश्चिम उत्तर प्रदेश आधीच भाजपसाठी आव्हान बनला आहे. चार महिन्यांनंतर राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे राजकीय गणित बिघडू शकते.

राज्यातील राजकारणाचे निरीक्षक वरिष्ठ पत्रकार सिद्धार्थ कलहंस यांच्या म्हणण्यानुसार लखीमपूर खीरी घटनेत थेटपणे भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचे नाव जोडले जात आहे. पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये शेतकरी आधीच नाराज होते. भाजप या घटनेनंतर बॅकफूटवर असून पक्षाच्या एका प्रमुख प्रवक्त्याने काहीही भाष्य करण्यास नकार देत म्हटले की, या प्रकरणी उत्तर प्रदेश शाखा बोलेल.

राज्यातील भाजपच्या सह निवडणूक प्रभारी सरोज पांडे यांनी काँग्रेस आणि विशेषत: काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यावर टीका केली. गांधी यांनी केलेल्या आरोपांवर त्यांनी विचारले की, “तुम्ही मृतदेहांचे राजकारण करणे कधी सोडणार आहात?” असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र उत्तरप्रदेश सरकारने ज्या प्रकारे लखीमपूर येथे घडलेली घटना हाताळली आहे त्यामुळे संपूर्ण देशभरात भाजपा विरोधात संतापाची लाट पसरली आहे.

Team Global News Marathi: