सिंधुदुर्ग | २०२४ च्या विधानसभा निवडणूका आता जवळ येऊन लागल्या असल्यामुळे असल्याने सर्वत्र निवडणूकीची जोरदार रणधुमाळी सुरु झाली आहे. सिंधुदुर्गमध्ये यावेळी कुडाळ- मालवण मतदारसंघातून निलेश राणे भाजपकडून लढणार आहेत. तसेच पुत्र निलेश राणे यांना या निवडणूकीत यश मिळावं यासाठी स्वत: नारायण राणे मैदानात उतरल्याचं दिसून आलं आहे.
शुक्रवारी कुडाळ येथे भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत खडेबोल सुनावले होते. राणे म्हणाले की, येणाऱ्या कोणत्याही निवडणुकीत मी गद्दारी सहन करणार नाही. गद्दारालाच पक्षातून बाहेर काढलं जाईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना भरला आहे. आधीच्या निवडणुकीच्या अनुभवावरून त्यांनी हा इशारा दिला.
ते म्हणाले, ‘येणाऱ्या कोणत्याही निवडणूकीत गद्दारी फितूरी मी सहन करणार नाही. माझ्या निवडणुकीत जे झालं. ते मी सहन केलं. पण येत्या निवडणुकीत जर कुणी गद्दारी केली. याला पाडा, याला अमुक करा, तमुक करा असे उद्योग केले तर पाहाच’, असं खडसावत ते पुढे म्हणाले, ‘गद्दाराला पक्षातून काढणं सोपं आहे, गद्दारी मला चालणार नाही. ती मी चालू देणार नाही.’