काही दिवसांपूर्वी अमीर खान याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली दुसरी पत्नी किरण राव हिच्यापासून विभक्त होत असल्याचा निर्णय घेतलेला असल्याचे त्याने जाहीर केले होते. त्याच्या या निर्णयावर अनेकांनी त्यांच्यावर सडकून टीका केली होती. मात्र आता पुन्हा एकदा लडाख येथे सुरु असलेल्या शुटींगच्या मुद्द्यावरून स्थानिकांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे.
अमीर खान यांच्या लालसिंह चड्डा या चित्रपटाचे शुटिंग लडाख येते सुरु आहे . मात्र या शुटिंगमुळे आपल्या टीमने तेथे मोठ्या प्रमाणात कचरा केल्याचा आढळून आला आहे सदर माहिती स्थानिकाने ट्विटवरून व्हिडीओ शेअर करून दिली आहे. व्हिडीओ लडाखमधील वाखा गावचा आहे. गावात सर्वत्र कचरा पसरलेला दिसतो. प्लास्टिकच्या बाटल्या आणि इतर कचरा सर्वत्र विखुरलेला दिसतोय.
‘अभिनेता आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा या सिनेमाची टीम गावाला ही भेट देऊन निघून गेली आहे. आमिर खान त्याच्या सत्यमेव जयते या शोमध्ये प्रदूषणाबद्दल मोठ मोठ्या बाता मारतो. मात्र स्वत:वर वेळ आली की हे असं असतं,’ असे हा व्हिडीओ शेअर करताना संबंधित युजरने लिहिले आहे. काही दिवसांपूर्वी ‘लाल सिंग चड्ढा’च्या सेटवरचा एक फोटो अभिनेता नागा चैतन्यने शेअर केला होता. यात आमिर व किरण राव दिसले होते. घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर पहिल्यांदा किरण व आमिर सोबत दिसले होते.
Thank you so much guys for your retweets and support this could not be possible with your support and shares . Together we stand jai hind jai bharat 🇮🇳 pic.twitter.com/fIMszBqMi5
— Jigmat Ladakhi 🇮🇳 (@nontsay) July 12, 2021