मुंबई | भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारमधील नेत्यांची यादी जाहीर करत त्यांना ‘डर्टी डझन’ अशी टीका केली होती. या नेत्यांनी भ्रष्टाचार, घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर आज शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर निशाणा साधला आहे. मी पुन्हा सांगतो ‘बाप बेटे जेलमध्ये जाणार’ असं संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे.
Mark my words…
I repeat :
"Bap Beta jail jayenge". Period.And rest assured, apart from Baap & Beta, 3 Central agency officials and their "Vasuli Agents" will also go behind bars.
Maharashtra Jhukega nahi ! pic.twitter.com/4SCyOY4Pna
— Sanjay Raut (@rautsanjay61) March 2, 2022
संजय राऊत आपल्या ट्विटमध्ये म्हणतायत की, “माझे शब्द अधोरेखित करा…. मी पुन्हा सांगतो ‘बाप बेटे जेल जाऐंगे’ आणि बाप-बेटा यांच्या व्यतिरिक्त तीन केंद्रीय तपास यंत्रणेंचे अधिकारी आणि त्यांचे वसुली एजंट देखील तुरुंगात जातील”. इतकेच नाही तर संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये शेवटची ओळ ही पुष्पा सिनेमातील डायलॉगचा संदर्भ घेत लिहिली आहे.
“महाराष्ट्र झुकेगा नहीं” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. “बाप बेटे जेलमध्ये जाणार, Wait and watch, कोठडीचं Sanitization सुरू” शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी १५ फेब्रुवारी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत भाजप नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला. भाजप नेते किरीट सोमय्या, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते मोहित कंबोज हे संजय राऊत यांच्या निशाण्यावर होते. त्यानंतर 16 फेब्रुवारीला संजय राऊत यांनी एक ट्विट करत म्हटलं, “बाप बेटे जेल मधे जाणार! असे सूचक ट्विट केले आहे.