भाजप नेते गिरीश महाजन यांना खोट्या केसमध्ये अडकवण्यासाठी कशा पद्धतीने षडयंत्र रचलं जात होतं. याचे पुरावे त्यांनी विधानसभेत सादर केले. सरकारी वकील, पोलीस, मंत्री आणि नेते कशा पद्धतीने या षडयंत्राचा भाग होते, हे देखील त्यांनी सांगितले. यामध्ये राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिल गोटे यांचा देखील सहभाग होता, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
दरम्यान अनिल गोटे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांवर जोरदार पलटवार केला आहे. अनिल गोटे म्हणाले, “देवेंद्र फडणवीस खोटो आणि लबाड माणूस आहेत, हे मला माहिती आहे. त्यामुळे त्यांनी सभागृहात केलेल्या
अनिल गोटे यांचा या वकिलांशी प्रत्यक्ष संवाद आहे. फोन कॉल्स आहेत. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झालेल्या भेटी-बैठकी याचे तपशील देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिले, यावर अनिल गोटे म्हणाले, “मी कुणाचही ऐकत नाही. देवेंद्र फडणवीस यांना विचारा त्यांच तरी ऐकत होतो का, मी कुणाच्या बापाचं ऐकत नाही. मला जे पटतं ते मी करतो. मी चव्हाण वकिलांना भेटलो म्हणजे कुठल्या बाईला भेटलो का ? कमाल करत आहात”