मी दान करण्याची वस्तू नाही; नववधु IAS अधिकार्‍याने कन्यादानाला विधीस दिला नकार.!!

मी दान करण्याची वस्तू नाही; नववधु IAS अधिकार्‍याने कन्यादानाला विधीस दिला नकार.!!

मध्यप्रदेशच्या (Madhya Pradesh) नरसिंहपूर जिल्ह्यातील जोबा गावात महिला आयएएस अधिकारी आणि आयएफएस अधिकाऱ्याचे लग्न सध्या देशभरात चर्चेत आहे. यूपीएससी परीक्षेत देशात 23 वा क्रमांक पटकावणाऱ्या आयएएस तपस्या परिहार यांनी आयएफएस अधिकारी गरवित गंगवार यांच्याशी विवाह केला. या लग्नाची एका खास गोष्टीमुळे सध्या मोठी चर्चा सुरू आहे.

हिंदू संस्कृतीत कन्यादानाला विशेष महत्त्व आहे. मात्र नरसिंगपूर जिल्ह्यात जन्मलेल्या तपस्या परिहारने सर्व बंधनं तोडून आपल्या लग्नात कन्यादानाच्या सोहळ्याला नकार दिला. तपस्याने तिच्या वडिलांना सांगितलं की, मी दान करण्याची गोष्ट नाही, मी तुमची मुलगी आहे. तपस्या यांनी लग्नात कन्यादानाचा विधी करण्यास नकार दिला. त्यामुळे या लग्नात कन्यादानाचा सोहळा पार पडला नाही.

गुरुवारी जोवा गावात लग्नाचे रिसेप्शन पार पडले. यावेळी दोन्ही बाजूचे नातेवाईक व परिचितांची उपस्थिती होती.
आयएएस अधिकारी तपस्या सांगतात की, लहानपणापासूनच समाजाच्या या विचारसरणीचा विचार करायचे. मला वाटायचं की, माझ्या इच्छेशिवाय कोणी माझे दान कसे करू शकेल. हळुहळू मी माझ्या घरच्यांशी या विषयावर चर्चा केली आणि घरातील सदस्यांनीही यावर सहमती दर्शवली. मग यासाठी वराची बाजूही पटवून घेण्यात आली आणि कन्यादान न करता विवाह पार पडला.

आयएएस तपस्या परिहार म्हणतात, दोन कुटुंबांनी एकत्र लग्न केले तर ते मोठे, लहान किंवा उच्च आणि नीच असणे योग्य नाही. कोणी दान का करावे आणि लग्नासाठी तयार झाल्यावर घरच्यांशी चर्चा करून कन्यादानाचा सोहळाही लग्नापासून दूर ठेवला.

ग्लोबल न्युज नेटवर्क: